कोंकण महाराष्ट्र

कोकण किनारपट्टी वरील ‘रापण’ मासेमारी

कोकणच्या किनारपट्टीवर रापण या पारंपारिक पद्धतीने मासेमारी केली जाते.

महाराष्ट्रातील एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात १०८ रापण असोसिएशन असून या माध्यमातून २७,००० कुटुंबे आपले पोट भरत आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हात मालवणमध्येच ५६ रापण संघ आहेत ज्यात १० हजार ते १२ हजार लोक समाविष्ट आहेत, जे पारंपारिक मासेमारीच्या व्यवसायात सक्रियपणे सहभागी आहेत.

सिंधुदुर्गच्या किनारी पट्ट्यात पारंपारिक मासेमारी व्यवसाय हळूहळू कमी होत असताना, बेरोजगार असलेल्या अनेकांसाठी हाच व्यवसाय आशेचा किरण बनला आहे.

पारंपारिक मासेमारीत गुंतलेले २० टक्के मनुष्यबळ हे शिक्षित असले तरी ते बेरोजगार असल्याने हा व्यवसाय निवडत आहेत.

गेल्या तीन वर्षाच्या काळात मच्छिमार बांधवाना अनेक संकटाना तोंड द्यावे लागले. कोरोना काळात फारच वाईट अवस्था आली होती.

कोकण किनारपट्टीवर सापडणारी मासळी स्थानिक बाजारपेठेत विकली जाते परंतु त्यातील बहुतांश मासळी बेंगळुरू, हुबल्ली आणि गोवा यांसारख्या ठिकाणी पाठवली जाते जिथे घाऊक विक्रेते त्याचा साठा करतात आणि नंतर देशाबाहेर निर्यात करतात.

यांत्रिक मासेमारीच्या आक्रमणामुळे आणि हवामानातील बदलांमुळे विस्कळीत झालेल्या पारंपारिक मासेमारीच्या सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणात मासळी मिळणे हि अत्यंत दुर्मिळ घटना झाली आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment