कोंकण महाराष्ट्र

रत्नागिरीत एकाची आत्महत्या, दुसऱ्याचा समुद्रकिनारी सापडला मृतदेह

रत्नागिरी – शहरानजीकच्या शिरगांव येथील एका ४३ वर्षीय इसमाने गळफास लावुन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सचिन गणपत घडशी (४३,रा.शिरगांव घडशीवाडी, रत्नागिरी ) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. मूल होत नसल्याच्या कारणातून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना गुरुवार ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.४० वा. सुमारास समोर आली आहे. सचिनच्या लग्नाला १० वर्षे झाली होती. परंतु त्याला मुलबाळ नव्हते या कारणातून त्याने गुरुवारी सायंकाळी घराच्या लाकडी वाश्याला नायलॉन दोरीने गळफास घेतला. ही बाब त्याच्या घरातल्याना समजताच त्यांना मोठा धक्का बसला. शिरगांव येथील खासगी डॉ.सगिरा कोंडकरी यांच्याकडे नेले असता त्यांनी सचिनला तपासून मृत घोषित केले. पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भाटये समुद्रकिनारी मृतदेह शहरानजिकच्या भाटये समुद्रकिनारी गुरुवारी दुपारी आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे. हेमंत राजाराम शिंदे(६२ ,रा.वडवली, ठाणे) असे मृताचे नाव आहे. गुरुवारी दुपारी भाटये समुद्रकिनारी तेथील नागरिकांना अज्ञात मृतदेह दिसून आला होता. याप्रकरणी त्यांनी शहर पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला होता. याप्रकरणी तपास करताना शहर पोलिसांना तो मृतदेह हेमंत राजाराम शिंदे यांचा असल्याची माहिती मिळाली असून अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment