पश्चिम महाराष्ट्र

कृषी व तंत्र विद्यापीठाचा द. कोरियाच्या योन्सई विद्यापीठाशी सामंजस्य करार

कोल्हापूर – जागतिक विद्यापीठ क्रमवारीत ७३ व्या स्थानी असलेल्या दक्षिण कोरियातील योन्सई विद्यापीठाच्या ऐरोजेल मटेरियल रिसर्च सेंटर व डी. वाय .पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे यांच्यात नुकताच आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार संपन्न झाला. या करारामुळे डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान शाखेला आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन करण्यासाठी नवे व्यासपीठ मिळाले आहे. या करारामध्ये विद्यार्थी- प्राध्यापक विनिमय कार्यक्रम,जोड प्रकल्प, प्रगत संशोधन अशा बहूआयामी बाबी राबविण्यात येणार आहेत.

विद्यापीठाच्या विद्यार्थी व प्राध्यापक यांना आता अभ्यासक्रमातील काही काळ कोरियामध्ये जाऊन नवीन संशोधन अभ्यासाची सुवर्णसंधी मिळणार आहे. योन्सई विद्यापीठाचे प्रोफेसर एच.एच. पार्क यांनी त्यांच्या विद्यापीठाबद्दल माहिती दिली. भारतीय संशोधकांबद्दल आदर व्यक्त करत त्यांनी येथील विद्यार्थ्यांचे श्रम, कौशल्य, व ज्ञान कौतुकास्पद असल्याचे सांगितले. या कराराद्वारे दोन्ही विद्यापीठे मिळून संशोधन उपक्रम राबवू असेही ते म्हणाले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन यांनी गरीब व होतकरू विद्यार्थ्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधनासाठी संधी उपलब्ध करून देण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली व तसेच “डी वाय पाटील” ग्रुप बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.

कुलसचिव डॉ.जे.ए. खोत यांनी विद्यार्थी शिक्षक विनिमय, संशोधन शोधनिबंध, प्रस्ताव, सेमिनार, कौशल्ययुक्त कोर्सेस संयुक्तरित्या राबविण्यासाठी कटिबद्ध राहू असे आश्वासन दिले. हा करार यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी योन्सई विद्यापीठाचे रिसर्च प्रोफेसर डॉ. विनायक पारळे, डॉ. वर्षा पारळे, तेही किम तसेच “डी.वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे असोसिएट डीन डॉ. गुरुनाथ मोटे व डॉ. संदीप वाटेगावकर यांनी अथक परिश्रम घेतले. कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली हा करार करण्यात आला.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment