विदर्भ

खासदार राणांच्या कृषी महोत्सवाचा खर्च रणजीत पाटलाकडून वसूल करा

अमरावती – पदवीधर निवडणुकीची सध्या आचारसंहिता सुरू आहे युवा स्वाभिमान पक्षाच्यावतीने भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉ. रणजीत पाटील यांना पाठिंबा देण्यात आला आहे. शासकीय निधीतून खासदार नवनीत रवि राणा यांनी कृषी महोत्सव भरवला याच कृषी महोत्सवातून राजकीय भाषणे मतदारांना आमिष, प्रलोभन देण्याचे काम सुरू असल्याची तक्रार पदवीधर मतदार संघाचे उमेदवार ॲड. धनंजय तोटे यांनी निवडणूक आयोगाकडे केल्याने पुन्हा एकदा कृषी महोत्सवावरून सुरू असलेला वाद तापण्याची शक्यता आहे.

सध्या अमरावती विभागात पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी व भारतीय जनता पार्टीसह अपक्ष उमेदवार आचारसंहितेचे पालन करून आपापल्या निवडणुकीचे नियोजन करत आहे. पदवीधर निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला जाहीर पाठिंबा देणाऱ्या युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने शासकीय निधीमधून अमरावतीतील सायन्स कोर मैदानात कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या किती महोत्सवांनी आचारसंहितेचा भंग पिण्याचे कारण देते या ठिकाणावर असेल नेत्यांचे व खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांचे पोस्ट काढून हा महोत्सव बंद करण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिले होते मात्र तो अजूनही बंध न झाल्याने पदवीधर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार ॲड धनंजय तोटे यांनी थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

व्यवसायाने वकील असलेले धनंजय तोटेही विविध सामाजिक राजकीय चळवळीमध्ये सक्रिय आहेत. विभागातील तीस ते चाळीस हजार वकिलांच्या पाठिंब्याने आपण ही निवडणूक लढत असल्याचे सांगितले आहे. एडवोकेट धनंजय तोटे यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, अमरावती पदविधर मतदारसंघात निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाद्वारे जाहिर करण्यात आल्यानुसार प्रगतीत आहे.

सदर प्रक्रीया सुरू असतांना आदर्श आचारसंहीतेचे पालन तमाम उमेदवार व राजकीय पक्षांनी करणे बंधनकारक आहे. डॉ. रणजीत पाटील हे १४ भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार असून त्यांना युवा स्वाभीमान पक्षाच्या खासदार नवनित राणा व आमदार रवी राणा यांनी जाहिर पाठींबा दिलेला आहे. या युवा स्वाभीमान पक्षातर्फे कृषी प्रदर्शन आणि महोत्सव, शासकीय निधीतुन आयोजित करण्यात आला असून सदर कार्यक्रमस्थळी राजकीय नेत्यांचे पोस्टर, बॅनर, समर्थन करण्यात आलेल्या उमेदवाराच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. सदर बाबी लक्षात आल्यानंतर मा. जिल्हाधिकारी तथा सहा. निवडणुक अधिकारी यांनी कार्यक्रम बंद करण्याचे आदेश जारी केले.

सदर आदेश अंमलात असतांना सुद्धा कार्यक्रम विनादिक्कत सुरु आहे. राजकीय नेत्यांची सातत्याने वर्दळ सुरू आहे. राजकीय प्रलोभन देणे, उमेदवाराला समर्थन मागणे, उमेदवाराचा प्रचार करणे आदी बाबी शासकीय तथा सार्वजनीक निधीतून करण्यात येत आहेत. सर्व बाबी प्रशासन उघड्या डोळ्यांनी बघत आहे. डॉ. रणजीत पाटील यांच्या विरुद्ध आचारसंहीता भंगाची कार्यवाही करण्यास सदर बेकायदेशीर कृती पात्र आहे. सबब डॉ. रणजीत पाटील यांच्या आदेशाविरूद्ध आचारसंहीता भंगाची कार्यवाही करावी आणि युवा स्वाभीमान पक्षातर्फे आयोजित कृषी महोत्सवाचा संपुर्ण खर्च हा डॉ. रणजीत पाटील यांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात यावा. शुक्रवारी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार खासदार नवनीत रवी राणा यांच्या कृषी महोत्सवावर कारवाई करण्यात आली होती आता ऍडव्होकेट धनंजय तोटे यांनी केलेल्या तक्रारीनंतर हा वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे या वादावर निवडणूक आयोग काय कारवाई करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment