महाराष्ट्र

मिरजेत अडीच कोटींचे लाल चंदन जप्त

बेंगलोर मधून आला होता चंदनाचा साठा, गांधी चौकी पोलिसांची कारवाई

सांगली ब्रेकिंग

लाल चंदनाच्या तस्करीवर सध्या गाजत असलेल्या पुष्पा चित्रपटाप्रमाणेच मिरजेतही लाल चंदनाची तस्करी उजेडात आणण्यात महात्मा गांधी चौकी पोलिसांना रविवारी मध्यरात्री यश आले आहे.

मिरज-धामणी रस्त्यावरून वाहतूक केला जाणारा सुमारे ९८३ किलो वजनाचा लाल चंदनाचा साठा आणि वाहतुकीचा टेम्पो असा 2 कोटी, 45 लाख, 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

महात्मा गांधी चौकी पोलिस आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने रविवारी रात्री 2.50 वाजता ही कारवाई केली असून या प्रकरणी यासिन इनायत उल्ला खान याला अटक आली आहे. चंदन तस्करी प्रकरणी जिल्ह्यातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.

मिरज-धामणी रस्त्यावरून बेंगलोर येथील (KA13- 6900) हा टेम्पो लाल चंदन घेऊन कोल्हापूर जिल्ह्याकडे जात असल्याची माहिती महात्मा गांधी चौकी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस आणि वन विभागाच्या पथकाने मिरज - धामणी रस्त्यावर नाकाबंदी करून सदर टेम्पो पकडला. 

या टेम्पोत लाल छंदाची एकूण ३२ नग ९८३ किलो ४०० ग्राम वजनाचे लाल चंदन मिळून आले. पोलिसांनी लाल चंदन आणि टेम्पो जप्त केला आहे. सदर चंदन कोल्हापूर जिल्ह्यात कोणाकडे जाणार होते? या तस्करीचा ' पुष्पा ' कोण याचा पोलीस तपास करीत आहे. एकीकडे चंदन तस्करी वरून पुष्पा चित्रपट गाजत असताना दुसरीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात चंदन जप्त करण्यात आल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment