पश्चिम महाराष्ट्र

रेणुका देवीच्या यात्रेस वैद्यकीय सेवा आणि अल्पोपहार वाटप

कोल्हापूर – महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांच्या वतीने कर्नाटकातील सौंदत्ती गडावर रेणुका देवीच्या यात्रेनिमित्त येणा-या भाविकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा आणि अल्पोपहार वाटपची सुरवात करण्यात आली. कोरोनाच्या निर्बंधानंतर यावर्षी पुन्हा एकदा भक्तांच्या उत्साहात सौंदत्ती येथे रेणुका देवीची यात्रा संपन्न होत आहे. कोल्हापूरसह महाराष्ट्र, कर्नाटक तसेच देशाच्या कानाकोप-यातून भाविक या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत.

कोल्हापुरातून जाणा-या भाविकांना देण्यात येणा-या एस. टी बसेस च्या मागील खोळंबा तसेच इतर सर्व शुल्क कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी केलेला पाठपुरावा आणी तात्काळ राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आदेश यामुळे हजारो भाविकांना आर्थिक दिलासा मिळाला आहे.

सौंदत्ती यात्रेदरम्यान नागरिकांचे आरोग्य बिघडू नये, तसेच बिघडल्यास तात्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी या हेतूने आ. राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या माध्यमातून मोफत वैद्यकीय सेवा तज्ञ डॉक्टरांच्या टीमच्या नेतृत्वाखाली सुरु आहे. त्याचं बरोबर भाविकांसाठी मोफत अल्पोपहार देखील देण्यात येत असून याचा लाभ हजारो भाविक घेत आहेत.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment