विदर्भ

महापौर प्रदीप कर्पे यांचा राजीनामा

धुळे – महापालिकेच्या महापौर पदाचा प्रदीप कर्पे यांनी काल सायंकाळी उशिरा राजीनामा दिला असून त्यांच्या राजीनामाची गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती यामुळे आता पुढील महापौर पदी नेमकी कोणाची वर्णी लागते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

धुळे महापालिकेच्या महापौर पदाचा प्रदीप कर्पे हे राजीनामा देणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती अखेर काल सायंकाळी उशिरा त्यांनी आपला महापौर पदाचा राजीनामा दिला असून माजी महापौर चंद्रकांत सोनार यांनी राजीनामा दिल्यानंतर १७ सप्टेंबर २०२१ रोजी प्रदीप कर्पे यांची महापौरपदी निवड झाली होती. यानंतर न्यायालयात आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर १६ मे २०२२ रोजी त्यांनी राजीनामा दिला होता मात्र न्यायालयात दिलासा मिळाल्याने महापौर पद पुन्हा ओबीसींसाठी आरक्षित झाले होते. यामुळे दुसऱ्यांदा पुन्हा एकदा प्रदीप कर्पे यांना महापौरपदी विराजमान होण्याची संधी मिळाली होती, काल सायंकाळी पक्षाच्या आदेशाने त्यांनी राजीनामा दिला असून आता महापौर पदाची संधी कोणाला मिळते याकडे भाजपच्या नगरसेवकांचे लक्ष लागून आहे.

धुळे महापालिकेत भाजपची एक हाती सत्ता असून आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांच्या दृष्टीने भाजपाची आतापासून तयारी सुरू झाली आहे या पार्श्वभूमीवर महापौर बदलाची चर्चा सुरू असून नवीन महापौराला आता जवळपास आठ महिन्यांचा कालावधी मिळणार आहे या आठ महिन्यात शहरातील विकास कामे पूर्ण करण्यासह आगामी निवडणुकांच्या दृष्टीने देखील महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागणार आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment