रत्नागिरी खेड – तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या खेड आम्बवली मार्गावरील देवघर गावानजीक रिक्षाला झालेल्या अपघातात नऊ महिला गंभीर जखमी झाल्या या सर्व महिला हळदी कुंकुंवाचा कार्यक्रम आटोपून घरी परतत होत्या अशी प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. सायंकाळच्या सुमारास हा अपघात घडला. मकर संक्रात झाल्यानंतर ठिकठिकाणी हळदी कुंकू कार्यक्रमाला सुरवात होते. खेड तालुका देखील याला अपवाद नाही मकरसंक्रांतीपासून खेड तालुक्यात देखील हळदी कुंकू कार्यक्रमाला सुरवात झाली आहे. आज सायंकाळी देवघर येथील एका वाडीत हळदीकुंकू कार्यक्रम असल्याने याच गावातील पण दुसऱ्या वाडीतील काही महिला रिक्षा करून या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या.
हाडळीकुंकवाचा कार्यक्रम आटोपुन या महिला त्याच रिक्षाने आपल्या वाडीत परतत असताना त्यांच्या रिक्षाचा अपघात झाला आणि या अपघातात रिक्षातील सर्वांच्या सर्व ९ महिला गंभीर जखमी झाल्या. जखमी महिलांना तात्काळ कळंबणी येथील उपजिल्हा उपचारांसाठी दाखल करण्यात आले असून या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हळदी कुंकवाचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या महिलांच्या रिक्षाला अपघात होऊन नऊ महिला जखमी झल्याचे वृत्त वाऱ्यासारखे देवघर परिसरात पसरले आणि या परिवारातील ग्रामस्थांनी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातकडे धाव घेतली.
दरम्यान खेड पोलिसांनी या अपघाताची नोंद केली असून खेड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. जखमी झाले आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. पार्वती शंकर यादव ६५, ज्योत्स्ना जनार्दन शिंदे ४५,मनाली मनोहर कदम ३८,सुरेखा सुरेश शिंदे ५३,पार्वती कृष्णा महागावकर ४०,शर्मिला शांताराम कदम ४०,कल्पना संदिप शिंदे ३२, सविता सखाराम इंगळे ६५,सुगंधा भगवान इंगळे ६३ सर्व राहणार देवघर ता. खेड यामध्ये सरिता व सुगंध इंगळे या दोन गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना अधिक उपचार करता जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.