पश्चिम महाराष्ट्र

रिक्षा चालकांच्या आंदोलनाला मिळालं यश

पुणे – रिक्षा संघटनाच्या आंदोलना आज अखेर मोठं यश आलं प्राप्त झालं आहे. रॅपिडो बाईक टॅक्सी ॲप विरोधात उच्च न्यायालयाने कडक शब्दात सुनावले, व प्रवासी वाहतुकीच्या मागणीवर कोर्टाने ताशेरे ओढले. पिवळी नंबर प्लेट व तशेच इतर प्रवासी वाहतूक करणारे परवानगी मान्यता नसताना प्रवासी वाहतूक कशी होऊ शकते या मुध्यवर कोर्टाने रॅपिडो बाईक टॅक्सीला सवाल केला. मात्र दोन्ही बाजूच्या युक्ती वाद ऐकून आज उच्च न्यायालयाने बाईक टॅक्सी ॲप गुगल प्ले स्टोर वरून काढून टाकण्याचे आदेश दिलेत.

आजचा सर्व उच्च न्यायालयाचा आदेश फार महत्वपूर्ण मानला जातो, सर्व सामान्य रिक्षा चालकांची रॅपिडो बाईक टॅक्सी ॲप मुळे मोठी आर्थिक नुकसान झालं होतं. सहज रित्या बाईक वर प्रवासी वाहतूक उपलब्ध होऊ लागल्याने सर्व सामान्य नागरिकांनी रिक्षा पासून तोंड फिरवलं होत. ही आर्थिक नुकसान थांबण्या साठी पुण्यातल्या आरटीओ कार्याला बाहेर सगळ्या रिक्षा संघटनांनी ठिया मांडत आंदोलन केलं होतं. दिवसभर चाललेल्या आंदोलन पुण्यासह राज्यासाठी लक्षवेधी राहिला. मात्र पुण्यातल्या मुख्य रस्त्यावरती या आंदोलन सुरू असताना इतर सगळे रस्ते वाहतुकीने पॅक झाले होते. म्हणून पोलिसांना विनंती करत हे आंदोलन मोडीत काढावे लागलं होतं. बरेचश्या आंदोलन करत्या रिक्षा चालकांवर गुन्हेही दाखल झाले होते. मात्र नंतर ही लढाई न्यायालयात पर्यंत पोहचली आणि आज उच्च न्यायालयाने रिक्षा चालकांच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर एक प्रकारे रिक्षा आंदोलनला यश मिळालं असं म्हणायला काही चुकीचं वाटणार नाही.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment