पश्चिम महाराष्ट्र

रिक्षा संघटनांचा एल्गार, पुण्यात चक्काजाम होणार

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षाचालक आजपासून पुन्हा संपावर जाणार आहेत. बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात प्रशासनाने तोडगा न काढल्याने पुण्यातील रिक्षाचालक पुन्हा एकदा संपावर जाणार असल्याची माहिती रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष आणि रिक्षा आंदोलन कृती समितीचे केशव क्षीरसागर यांनी दिली आहे.

पुण्यात एकूण 12 रिक्षाचालक संघटना आहेत. या रिक्षा चालकांनी बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून संप पुकारण्याची घोषणा केली आहे. 14 दिवसांचा अल्टिमेटम देऊनही प्रशासनाने मागण्या पूर्ण केल्या नाही. त्यामुळे प्रशासनाने फसवल्याचा आरोप करत रिक्षा चालक संघटना आंदोलनावर ठाम आहेत.

प्रशासनाने आम्हाला पुन्हा फसवलं, त्यामुळे आम्ही आंदोलनावर ठाम आहोत. गेल्या वर्षभरापासून आम्ही बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात आंदोलन, निवेदने सरकार आणि प्रशासनासमोर करत आहोत. परंतु आज तागायत आमच्या तोंडाला पाणी पुसण्याशिवाय भ्रष्ट अधिकाऱ्यांनी काहीही केले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आदेश देऊन सुद्धा वरिष्ठ अधिकारी बेकायदा बाईक टॅक्सीवर कारवाई करण्यास तयार नाही. असा गंभीर आरोप क्षीरसागर यांनी केला आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment