NITESH RANE : सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाबाहेर रंगला हाय होल्टेज ड्रामा
आमदार नितेश राणे जाणार मुंबई उच्च न्यायालयात
सिंधुदुर्ग – आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्जावरील फेरविचार याचिका जिल्हा न्यायालयाने फेटाळली आहे त्यामुळे नितेश आणि हे पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत.
जाने यांच्या वकिलांनी कसे स्पष्ट केले आहे दरम्यान नितेश राणे यांनी शरण न येता जामिनावरील फेरविचार याचिका दाखल केल्याने त्यांचा हा अर्ज फेटाळण्यात आला असल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली आहे. आमदार नितेश राणे हे कणकवलीतील आपल्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.
कणकवली शहरातील नरडवे फाटा येथे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबरला हल्ला झाला होता. या प्रकरणी आमदार राणे २८ जानेवारीला जिल्हा न्यायालयात हजर झाले. त्यांनी नियमित जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला.
तो अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करून घेण्यात आला. न्यायाधीश रोटे यांनी यावर प्राथमिक युक्तिवाद ऐकून घेतला. आज सकाळी ११ वाजल्यापासून सायंकाळी 3 वाजेपर्यंत सुनावणी चालली. सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील घरत, भूषण साळवी यांनी आमदार राणे यांना पोलिस कोठडी देण्याची मागणी केली.
बचाव पक्षाच्या वतीने बाजू मांडताना सतीश मानशिंदे यांनी आमदार राणे यांना जामीन मिळावा यासाठी युक्तिवाद केला. त्यांना वकील संग्राम देसाई, राजेंद्र रावराणे, राजेश परुळेकर यांच्यासह अन्य वकिलांच्या पथकाने साथ दिली.
आमदार नितेश राणे यांची गाडी पोलिसांनी अडविली
आमदार नितेश राणे यांची गाडी पोलिसांनी अडविली. न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्या नंतर ते जात असताना पोलिसांनी त्यांच्या समोर आपल्या गाड्या लावल्या.
यामुळे वातावरण तंग झाले. यावेळी माजी खा निलेश राणे आक्रमक बनले. थांबविण्याचे आदेश दाखवा अशी त्यांनी पोलिसांकडे मागणी केली. यावेळी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते.
आ. नितेश राणे पुन्हा न्यायालय इमारतीत दाखल
यानंतर गाडीतून उतरत आ. नितेश राणे पुन्हा न्यायालय इमारतीत जाऊन बसले. जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्या नंतर आ. नितेश राणे वाहनांसह घरी निघालेले असताना पोलिसांनी आपली वाहने समोर लावत त्यांना घेराव घातला होता. यानंतर माजी खा. निलेश राणे यांनी तुम्ही कोणत्या नियमात अडविले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दहा दिवस दिलासा दिला आहे. जर तुम्ही अडवत असाल तर आदेश दाखवा, अशी मागणी पोलिसांजवळ केली. यावेळी पोलीस निरुत्तर झाले. त्यानंतर त्यांचे वकील संग्राम देसाई व सतीश मानशिंदे पुन्हा नितेश राणे असलेल्या ठिकाणी आले व त्यांना जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत पुन्हा घेऊन गेले.
नितेश राणे यांचे वकील म्हणाले
यानंतर पुन्हा एकदा आमदार नितेश राणे यांच्यासह त्यांचे दोन्ही वकील बाहेर आलेत. यावेळी बोलताना सतीश मानशिंदे म्हणाले पोलिसांनी नितेश राणे यांना अडविल्याचे आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
न्यायालयाने त्यांना सुप्रीम कोर्टाने राणे यांना दहा दिवसाची मुदत दिली असल्याने अटक करता येणार नसल्याचे सांगितले. पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे त्यांची ही दादागिरी असून आम्ही ती न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊ असे ते म्हणाले.
सरकारी वकील म्हणाले
सरकारी वकील प्रदीप घरत यावेळी बोलताना म्हणाले, नितेश राणे हे न्यायालयाला रीतसर शरण न येता त्यांनी आपल्या अटकपूर्व जामीन अर्जावर फेरविचार करावा अशी याचिका न्यायालयात दाखल केली होती.
ते न्यायालयात शरण न आल्याने या याचिकेवर या न्यायालयात सुनावणी होऊ शकत नाही असे कारण देत न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला आहे.
नितेश राणे कणकवली निवासस्थानी दाखल
न्यायालयाने सुप्रीम कोर्टाचे दहा दिवसाचे संरक्षण मान्य केल्यानंतर आमदार नितेश राणे हे कणकवलीच्या दिशेने रवाना झाली कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी ते दाखल झाले आहेत.
दरम्यान जिल्हा न्यायालय आहे पोलिसांनी आमदार नितेश राणे यांची गाडी थांबवतात मोठा हाय वोल्टेज ड्रामा या ठिकाणी घडला. या सर्व प्रकरणाने जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले आहे