कोंकण खान्देश देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा महाराष्ट्र मुंबई विदर्भ संपादकीय

रोहा पोलिसांना मा. न्यायालयाचा दणका !

व्हीआरओ कंपनीचे संचालक रोहन भेंडे यांना ४ तासातच जामीन मंजूर

पोलिसांनी केलेल्या आरोपांमध्ये किती तथ्य?

रायगड जिल्ह्यातील रोहा येथे कार्यान्वित व्हीआरओ ग्रृप ऑफ कंपनीचे संचालक रोहन भेंडे व वैशाली पाटील यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा आरोप करून पुष्कर गावडे या तरूणाने गुन्हा दाखल केला होता. हि घटना एप्रिल २०२२ मधील असून त्यावेळेची मा. माणगांव न्यायालयाने अटकपूर्व जामीन दोन्ही संचालकांना मंजूर केला होता. संचालक रोहन भेंडे हे बाहेर राज्यात असताना, आणि कोविड ग्रस्त असल्यामुळे त्यांना चौकशी करिता हजर राहता आले नव्हते.

दिनांक १४ डिसेम्बर ते १७ डिसेम्बर २०२२ ह्या काळात VRO कंपनीच्या उत्पादन प्रक्रिया युनिट चे उदघाटन समारंभ होता. त्या समारंभादरम्यान रोहन भेंडे  यांना रोहा पोलिसांनी चौकशी साठी ताब्यात घेतल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर त्यांना अटक करून पोलिसांनी मा. न्यायालयासमोर पोलीस कस्टडी करिता हजर केले असता न्यायालयाने त्यांना अवघ्या ४ तासात जामीन मंजूर केला. रोहा पोलिसांनी दिलेल्या वेगवेगळ्या argument कोर्टाने फेटाळत, तपासणी अधिकारी म्हणत असलेल्या सर्व बाबींना मोडत काढीत न्यायालयाने आपला निर्णय दिला.

या पत्रावरून कंपनीत आजही मशीन तयार असल्याचे दिसून येत आहे

तक्रारदार पुष्कर गावडे याने उदयोग सुरू करण्यासाठी व्हीआरओ कंपनीमार्फत भेंडे यांच्याकडून ५० लाख रूपयांच्या मिनरल वॉटर प्लँटच्या मशीनखरेदीसाठी आर्थिक व्यवहार केला होता. याअंतर्गत १५ लाख रूपये अनामत रक्कम गावडे याने दिली होती. त्यानुसार भेंडे यांनी संबंधित मशीन बनवण्याची ऑर्डर इंडियन आयर्न कंपनीकडे पाठवली होती. दरम्यान, गावडे याने मशीन खरेदी करण्यास नकार देत अनामत स्वरूपात भेंडे यांना दिलेली रक्कम परत मागितली. तसेच व्हीआरओ कंपनी व भेंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.  मात्र, कंपनीकडे मशीन बनवण्याची ऑर्डर देण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याने पैसे परत करणे शक्य नव्हते. तसेच सध्या गावडे यांच्या ऑर्डऱनुसार कंपनीने मशीन बनवले असून ते उत्पादननिर्मितीसाठी सज्ज आहे. या मशीनची उत्पादननिर्मितीची चाचणीही यशस्वी झाली. तसेच मशीन डिलिव्हरी साठी तयार असल्याचे पत्र उत्पादननिर्मिती करणारी कंपनी “इंडियन आयन एक्सचेंज ” ह्यांनी मार्च महिन्यातच दिलेले आहे.

गावडे यांच्यासोबत अटी शर्थींच्या आधारेच अत्यंत पारदर्शक व्यवहार करण्यात आला होता त्याचा हा पुरावा

व्हीआरओ कंपनी ही महाराष्ट्रातील संपूर्ण महिला कर्मचाऱ्यांकडून चालवली जाणारी पहिली कंपनी आहे.  या कंपनीत मिनरल वॉटर, पोटॅटो चिप्स आणि कापडी पिशव्या बनवण्याचं काम केलं जातं. महिला कर्मचारीच उत्पादन निर्मिती करतात. रोहन भेंडे आणि वैशाली पाटील हे या कंपनीचे संचालक म्हणून काम करतात. भेंडे आणि पाटील हे उदयोगक्षेत्राबरोबरच पत्रकारितेतही कार्यरत आहेत. या कंपनीच्यामार्फत परिसरातील नवउद्योजकांना उद्योग करता यावा यासाठी मशीन खरेदी करण्यासाठी मदत केली जाते. त्यानुसार पुष्कर गावडे याने संपर्क साधला होता. १५ लाख रूपये अनामत रक्कम देऊन त्याने प्रक्रिया करण्यास परवानगी दिली. गावडे यांच्याशी झालेल्या व्यवहारानुसारच मशीन बनवण्याची ऑर्डर उत्पादननिर्मिती कंपनीला देण्यात आली. मात्र आता तयार झालेले मशीन स्वीकारण्यास गावडे यांनी नकार दिला तसेच भेंडे यांच्याविरोधात आर्थिक फसवणुकीची खोटी तक्रार दाखल केली होती. यापूर्वीही रोहा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र या खटल्यातील तपशील पाहून माणगाव न्यायालयाने रोहन भेंडे व वैशाली पाटील यांना अटकपूर्व जामिन मंजूर केला होता.

या प्रकरणाबाबत अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. व्हीआरओ कंपनी प्रणित विष्णूनगर वूमन्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांवरही दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचे रोहन भेंडे यांचे म्हणणे आहे. कंपनीतील काही महिला कर्मचाऱ्यांना फोन करून, भेंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा. असे केल्यास तुम्हाला पैसे देऊ असे आमिष या महिलांना दाखवण्यात आल्याची माहिती भेंडे यांना मिळाली आहे.

“दोन दोन वेळा एकाच खटल्यात मा. माणगाव न्यायालय आणि रोहा न्यायालायने आधी अटकपूर्व आणि आता अटकेनंतर तात्काळ जमीन मंजूर केला आहे. ह्यावरून ह्या तक्रारीत किती खरे आणि किती खोटे आहे हे समजून येतच आहे. आम्हाला न्यायालयावर संपूर्ण विश्वास असून न्याय आमच्या बाजूने होईल ह्यात आम्हाला शंका अजिबात नाही. आम्ही मा. उच्च न्यायालय मुंबई येथे हि तक्रार दाखल करण्याकरिता अर्ज दाखल केला आहे, आणि पुढील तारखेवर कोर्ट ह्यावर न्यायनिवाडा करेलच. पण प्रश्न हा आहे कि हे खोटे प्रकरण रेटून नेण्यास भूमिका बाजवणाऱ्याची मनीषा नेमकी काय आहे. ” असे प्रतिपादन रोहन भेंडे ह्यांनी पत्रकारांशी बोलतांना केले.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment