विदर्भ

ग्रामीण आणि शहरी नागरिकांनी राहावे सावध

अमरावती — शहरात आणि ग्रामीण भागात चोरीच्या प्रमाणात वाढ झाली असून, मोट्या प्रमाणात गुन्हेगारी प्रवृत्ती सुद्धा वाढली आहे, ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिक यांनी वेळीच सावधान नाही झाले , तर होऊ शकते मोठे आर्थिक नुकसान. ग्रामीण भागात शेतातून मोठ्या प्रमाणात स्प्रिंकलर नुजल आणि युपीईसी पाईप यांच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, महागडी साहित्य साधने चोरी मुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच शहरी भागात सुद्धा जागेच्या अभावी बरेच मंडळी दोन चाकी वाहने रात्रीच्या वेळी घराबाहेर उभी ठेवतात, परंतु काही चोरटे याच संधीचा फायदा घेऊन दोन चाकी वाहने चोरी करतात. या चोरीच्या प्रकारापासून वेळीच सावध होऊन, योग्य ती खबरदारी घ्यावी आणि चोरट्यापासून सावध व्हावे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment