विदर्भ

‘साद’कडून आदिवासींना आधार

अमरावती – नववर्ष म्हटलं की प्रत्येकांच्या भुव्या उंचावतात, थर्टी फर्स्टला मौजमस्ती आणि नवीन वर्षाचे स्वागत होतांना आपण अनेकदा बघतो, मात्र प्रदीप बाजड यांनी साकारलेल्या आधार फाऊंडेशन या सामाजिक संघटनेच्या वतीने मेळघाटातील भुलोरी या आदिवासी बहुल असलेल्या गावात नववर्षानिमित्त नवं संकल्पनासह उत्साहात साजरा करण्यात आला, या संकल्पनेला मुंबईच्या साद फाऊंडेशन व प्रभु नरवणे यांच्या मदतीतून वसंत भाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी बांधवांना ब्लँकेट देऊन थंडीची ऊब दिली आहे, त्याचबरोबर कपडे, शालेय साहित्य वाटप, पारंपारिक नृत्य, हॉलीबॉल सामने व बिस्कीट वाटपासह आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मेळघाटातील भूलोरी हे गाव आधार फाऊडेशनने दत्तक घेऊन जवळपास ५ महिने झाले आहेत, या कालावधीत गावातील लोकसहभागासह नागरिकांच्या योगदानातून गावाला बरीच भरीव मदत व लोकपयोगी कार्य आधारने निस्वार्थीपणे केले आहे. गावाला स्वच्छतेचे धडे देत सुशोभित करण्यात आले, त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी वाचनालयाची निर्मिती, आदिवासींना कपडे, मुलांना खेळणी, शालेय साहित्य वाटप करीत हॉलीबॉल मैदान तयार करून मुलांना सदृढ बनविण्याचा संकल्प आधारने हाती घेत तो निखळ आनंदपण जपला आहे.

नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हटलं की १ जानेवारी हेच डोळ्यासमोर येते, या दिवसाला आधार फाउंडेशनचे कार्यकारी सदस्य तसेच दत्तक गांव प्रकल्प प्रमुख वसंत भाकरे यांचा वाढदिवस. तसेच याप्रसंगी गावातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यगण तसेच गावातील देशाला सैनिक म्हणून सेवा देणारे जवान शालिग्राम सावलकर यांचा ही सत्कार आधारने नववर्षानिमित्त साजरा केला. त्याबरोबर प्रभु नरवणे यांनी १०० ब्लँकेट तर साद फाउंडेशन मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेले ६० ब्लँकेट असे एकूण १६० ब्लँकेट भुलोरी व भवरी गावातील गरजवंत आदिवासी बांधवांना वाटप करून निसर्गरम्य भूलोरी गावात सर्व उपस्थितीत मंडळींनी स्नेहभोजनाचा आनंद घेत नव वर्ष साजरे केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी माजी सरपंच साबुलाल बेठे, आधार फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रदीप बाजड, गाव प्रकल्प प्रमुख वसंत भाकरे, तसेच प्रभु नरवणे, नरवणे, अरविंद विंचूरकर, विंचूरकर, सहदेव पाटील,रामेश्वर वसु,अनंत बाजड, सविता बाजड, सतिश क्षिरसागर, सुनिल फुसे, सुर्यकांत बाजड, शेंडे साहेब, किशोर पन्नासे, सुशील श्रीवास, प्राजक्ता बानुबाकोळे, अर्चना खांडेकर, बाजड यानी सहभाग घेतला. मेळघाटातील थंडीचा विचार करून आधार ने ब्लँकेट नव वर्षाला भेट दिल्या बद्दल गावकऱ्यांनी आधार ला धन्यवाद दिले.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment