Uncategorized

उत्पन्नापेक्षा विक्री जास्त, देवगड हापूसचे खरे गौडबंगाल काय ?

विवेक ताम्हणकर, कोंकण 


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड  हापूस आंब्यामुळे प्रसिद्ध आहे. या तालुक्यात आंबा उत्पादन क्षेत्र आहे सुमारे १३ हजार हेक्टर. तर उत्पादन लायक क्षेत्र आहे ११ ते साडे ११ हजार हेक्टर. यातून हापूस आंब्याचं उत्पादन होतं ३५ ते ४० हजार मेट्रिक टन. मात्र बाजारपेठेतील मागणी हि ३ लाख टन मेट्रिक टन एवढी आहे. विशेष म्हणजे ही मागणी पूर्ण देखील होते. उत्पादनाच्या तुलनेत एवढी मोठी असलेली हि मागणी कशी काय पूर्ण होते, काय गौडबंगाल आहे या मागे. 


आंबा हा फ्रेश फ्रुटमध्ये येतो त्यामुळे त्याला बाजारसमितीध्येच विकणं गरजेचं नाही. कारण फ्रुट, व्हेजिटेबल या गोष्टी नाशवंत असल्याने त्यांना बाजारसमितीत आणण्याची सक्ती न करता शेतकऱ्याला त्याचे निर्णय घेण्याचे हक्क शासनाने दिले आहेत. म्हणून अनेक शेतकरी परस्पर त्यांचा आंबा व्यापाऱ्यांना विकतात. तर काही व्यापारी आधीच फळबागा विकत घेतात. 


हा आंबा विकण्यासाठी जेव्हा व्यापारी काढतात तेव्हा प्युअर देवगड हापूस विकणं सोयीस्कर जात नाही. कारण तो महाग असतो. अशा वेळी हे व्यापारी देवगड आंब्यातच कर्नाटकी आंबा मिक्स करून दर पाडतात. शिवाय स्वस्तातला कर्नाटकी हापूस मिक्स करुन हवा तितका नफा देखील कमावतात. कर्नाटकी, केरळी हापूस आंबे बऱ्यापैकी देवगड हापूस सारखेच दिसतात मात्र यांच्यात थोडाफार बदल असतो. 

देवगडच्या हापूसची साल अत्यंत पातळ असते. एक म्हणजे देवगड हापूस, रत्नागिरी हापूस असे नाव असलेले बॉक्स, पेट्या सहज उपलब्ध होतात. बॉक्स समजा ५ डझनचा असेल १ ते दीड डझन देवगड हापूस सोबत उर्वरित कर्नाटकी आंबा मिसळला जातो. 


कोकणातील हापूसला आता जिऑग्राफिकल इंडिकेशन मानांकन मिळालेले आहे. जीआय उत्पादनांचं उल्लंघन हा कायद्याने दखलपात्र गुन्हा आहे. जिऑग्राफिकल इंडिकेशन ॲक्ट सेक्शन ४९, ५० अन्वये हा गुन्हा रोखणं पोलीस यंत्रणांना बंधनकारक आहे.

तेव्हा याबद्दल रीतसर तक्रार होऊ शकते आणि अशा फ्रॉड लोकांवर कारवाई होऊ शकते. मात्र या कायद्यानुसार अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. 


देवगड हापूसची हि स्थिती सर्वाना माहित असूनही विकणारे देवगड हापूस म्हणून विकतात आणि घेणारेही देवगड हापूस म्हणूनच घेतात. मात्र यातील सत्यता तपासून पाहण्याची मेहनत कुणीच करत नाही, परिणामी कोकणातील देवगड हापूस उत्पादनाच्या तुलनेत मोठ्या संख्येने विकला जातो. यात श्रीमंत होतात ते व्यापारी. बागायतदार मात्र नेहमीच कर्जाच्या खाईत लोटला जातो.Attachments area

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment