विदर्भ

अखिलतेली समाज संघटनेच्या वतीने संत जगनाडे महाराज जयंती साजरी

नांदगाव पेठ – अखिलतेली समाज संघटना महाराष्ट्र राज्य यांचे वतीने अमरावती जिल्यातील नांदगाव पेठ येथे संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंतीनिमित्त संत काशिनाथ महाराज यांच्या सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी अध्यक्ष म्हणून प्रभूदास फंदे, उद्घाटक जगदीश गुप्ता व प्रमुख पाहुणे कैलास फंदे, उमेश शिरभाते , सुनील ढोले , प्रतिभा फंदे, विवेक गुल्हाने, नितीन हटवार, जयंत ढोले, प्रमोद सपकाळ, राजा हजारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला शर्वरी साखरवाडे व ज्ञानेश्वरी बानसुरे यांनी आलेल्या पाहून्याचे कुंमकुंम तिलक करून स्वागत केले , संताजी महाराज जगनाडे व संत काशीनाथ महाराज यांच्या फोटोचे पूजन आणि हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संदीप अकोलकर यांनी संचालन केले तर प्रसिद्ध व्याख्याते सोपण कन्हेरकर यांचे व्याख्यान युवा वर्गासाठी आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमात मोझरी येथील सरपंच सुरेंद्र भिवगडे,नीलिमा समरीत वऱ्हा सरपंच, निंभारी येथील बडवाईक सरपंच यांचे हस्ते तेली समाजातील गुणवंत विद्यार्थी यांचा संभाजी हटवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ पदक व संताजी महाराज जगनाडे यांची प्रतिमा देऊन पुरस्कृत करण्यात आले .

कार्यक्रमाला अमरावती जिल्हा संपर्कप्रमुख किशोर साखरवाडे, मनोज हटवार, अंकुश साकोरे ,सुनील धर्माळे , शिवा साठवणे, अनिकेत पारवी, अंकुश गभने, गोलू गभने, संतोष गडेकर,विनोंद गभने, श्रीकृष्ण साकोरे, अतुल राजगुरे ,गणेश राजगुरे, किशोर शिरभाते, विनोंद शिरभाते, बाळू शिरभाते, रामचंद्र पाटील, अमोल हटवार, किशोर ढोबरे ,भारत वंजारी, शंकर बारबुदे,निलेश साठवणे, रवी चोपकर, एकनाथ चोपकर, चक्रधर हटवार ,महादेव बानसुरे, इत्यादी उपस्थिती होती. नांदगाव पेठ येथील सर्व तेली समाजबांधव कार्यक्रमाचे आयोजक होते.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment