सांगली – राज्यातल्या सत्ताधाऱ्यांना मस्ती आली आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच खालच्या पातळीवरचे राजकारण सुरु आहे, त्यामुळे लोकशाही आणि संविधान धोक्यात आले आहे, असा आरोपही अजित पवार यांनी केला आहे, ते तासगावच्या आरवडे येथे बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्या असून, आज दिवसभर अजित पवार तासगाव तालुक्यातील विविध कार्यक्रमांना हजरी लावणार आहेत, तासगावच्या आरेवाडी या ठिकाणी अजित पवार दाखल झाले असून त्यांच्या हस्ते आरेवाडी ग्रामपंचायतीच्या नूतन ग्राम सचिवालय इमारतीचा लोकार्पण आणि विविध विकास कामाचा शुभारंभ पार पडला आहे, राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर.आर.पाटील व मान्यवर मंडळी उपस्थित होते, यानंतर पार पडलेल्या सभेत बोलताना अजित पवार म्हणाले, सरकारचं काय चाललंय? आम्ही, आर आर अनेक वर्षे सत्ते मध्ये होतो.
पण आम्ही असं कधी चुकीचे वागलो नाही. राज्यातील सरकारला सत्तेची मस्ती आलो आहे. पक्षांतर बंदी कायदाला तिलांजली दिली आहे, कंर्नाटक ,मध्यप्रदेश मध्ये सरकार पडले, हे सर्व ५० खोके, सरकार ओके. खालच्या पातळीवरचे राजकारण सुरु आहे, त्यामुळे लोकशाही आणि संविधान धोक्यात येईल, राज्याच्या मंत्री मंडळात एक पण महिला नाही, तुमच्या पोटात दुखतंय का ? महिलांना का घेत नाही, ? विस्तार पण करत नाही. राज्यात अत्यंत गलिच्छ राजकारण सुरू, मंत्री मंडळ पण वाढवत नाही, सगळयांनी मंत्री करतो म्हणून गाजर दाखवले, मात्र सत्ताधाऱ्यांना भीती वाटत आहे का मंत्री मंडळ विस्तार ? केंद्राच्या साखर निर्यात धोरणावर विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी सडकून टीका केली आहे, केवळ कोटा पद्धत धोरण घेऊन उत्तर प्रदेशच्या फायदा केला.
आम्ही ओरडून सांगतोय पण कोणी ऐकत नाही, महाराष्ट्रात प्रचंड साखर शिल्लक असून निर्यातीचा कोटा वाढवला तर राज्याच्या शेतकरयांना ६०० रूपये अधिकचा दर मिळेल, पण आमच्या शेतकरयांच्या हातात देवळातील घंटा देण्यात येत आहे. या सरकारचं काय चाललंय,छत्रपती यांच्याबद्दल बेताल बोलतात,आम्ही कसं खपवून घ्यायचे ,शाहू, फुले आणि कर्मवीर यांच्या बद्दल ही बोलतात, सरकारचे आमदार,मंत्री देखील बोलत आहेत.त्यांना लाज लज्जा शरम आहे,का नाही? छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल स्वराज रक्षक वक्तव्याचा पुन्हा उच्चार करत, मी काही चुकीचं बोललो नाही,पण ज्यांनी महापुरुषांच्या अवमान केला त्या पासून लक्ष विचलित करण्यासाठी विरोधाकांकडून टुकारपणा चालू आहे,असा आरोप अजित पवारांनी केला आहे.