कोंकण महाराष्ट्र

घोटाळा आणि अजित पवार समानार्थी शब्द आहेत; निलेश राणे यांची टीका

रत्नागिरी – अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडी कडून सरकारला लक्ष करण्यात आल आहे. राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार  यांनीही सरकारला जोरदार लक्ष केल आहे. नागपूर मध्ये सुरू असलेल्या वेळेच्या पहिल्या दिवशी शिंदे फडणवीस सरकारला महाविकास आघाडीचे नेत्यांकडून जोरदार लक्ष देण्यात आला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता भाजपाचे युवा नेते रत्नागिरी लोकसभेचे माजी खासदार निलेश राणे यांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्यावर ट्विटवरून टीका केली आहे.

आज अजित पवार यांना asset restructuring policy फडणवीस साहेबांनी दोन वेळा शिकवली. आजारी कारखाना कमी किमतीत खाजगी कंपन्यांना जाऊ नये जे घेण्यामध्ये पवार कुटुंबाची पीएचडी आहे त्यासाठी तयार केलेली पॉलिसी ही आहे. आता आमचं कसं होणार हे टेन्शन अजित पवारांना असावं. घोटाळा आणि अजित पवार समानार्थी शब्द आहेत, नशिब आहे तुमचं साहेब तुम्ही बाहेर आहात पण किती वेळ कोण सांगू शकत नाही असेही सूचक ईशारा देणारी टीका राणे यांनी केली आहे. सकाळी टीका करता संध्याकाळी सांभाळून घ्या म्हणून फोन करता या शब्दात टीका करत निलेश राणे अजितदादांना लक्ष केले आहे.

या शब्दात निलेश राणे यांनी राष्ट्रवादीचे अजितदादा पवार यांना लक्ष केल आहे. आता निलेश राणे यांनी केलेल्या टिकेनंतर राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्याकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment