पश्चिम महाराष्ट्र

स्कुटीवरून जाताना डंपरने ठोकले, दहा वर्षीय श्रीपादने सोडला प्राण

सोलापूर – रविवारी सायंकाळी डंपरने ऍक्टिवा वरून जाणाऱ्या एका कुटुंबाला ठोकले. दहा वर्षीय श्रीपाद पवन कवडे(वय १० वर्ष,रा, शिंदे चौक,सोलापूर शहर) याने आई वडिलांसमोर प्राण सोडला. मुलगा श्रीपाद हा,प्राण सोडत असताना,आई वडील हतबल झाले होते. रविवार असल्याने पवन हे आपल्या कुटुंबाला घेऊन पाहुण्यांकडे गेले होते. परत जाताना,जुना पुना नाका येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात ही घटना घडली. नागरिकांसमोर श्रीपादच्या आईने हंबरडा फोडला,ही हृदयद्रावक घटना पाहून नागरीकांनी डंपरचक्र तोडफोड केली व चालकाला चांगलाच चोप दिला.

डंपरने पाठीमागून धकड दिली
पवन कवडे यांना एक मुलगा एक मुलगी व पत्नी असा परिवार आहे. रविवारी असल्याने पवन कवडे हे कुटुंबाला घेऊन बाळे येथे गेले होते. परत जाताना सायंकाळी छत्रपती संभाजी महाराज चौकात वळण घेताना,पाठीमागून आलेल्या आलेल्या डंपरने (एमएच १३ सी यु ४९८७)ठोकरले. ऍक्टिवा वरून पवन कवडे त्यांची मुलगी,व पत्नी बाजूला फेकले गेले,मात्र श्रीपाद मागच्या चाकात चिरडला गेला. चौथीत शिक्षण घेणाऱ्या श्रीपादचा जागीच मृत्यू झाला. श्रीपादला रक्ताच्या थारोळ्यात पाहून आईने हंबरडा फोडला.

मन हेलावून टाकणारे दृश्य
चौथीत शिकणारा गुणी मुलगा डंपरखाली आल्याने जाग्यावरच चिरडला गेला. आई वडिलांचा आक्रोश पाहून नागरिकांचे मन सुन्न झाले होते. श्रीपादची आई वारंवार चक्कर येऊन खाली पडत होती,तर श्रीपादचे वडिलांच्या डोळ्यातील अश्रूच्या धारा थांबत नव्हते. रविवारी सायंकाळी छत्रपती संभाजी महाराज चौकात मन हेलावून टाकणारे दृश्य निर्माण झाले होते. आई वडिलांचा अक्रोश पाहून नागरिकांनी डंपरची तोडफोड करत,चालकाला चांगलाच चोप दिला. फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

दमाणी शाळेत इयत्ता चौथीत शिकत होता श्रीपाद
डंपर खाली चिरडून ठार झालेला श्रीपाद हा सोलापूर शहरातील दमानी शाळेत इयत्ता चौथीत शिक्षण घेत होता. शाळेत अतिशय हुशार असल्याची माहिती,शासकीय रुग्णालयात आलेल्या शिक्षकांनी दिली. विविध स्पर्धांत सहभाग घेऊन श्रीपादने बक्षिसे प्राप्त केली होती. हुशार व गुणी असल्याने वर्गशिक्षक व वर्ग मित्रांचा श्रीपाद हा आवडता मित्र व आवडता विद्यार्थी होता. रविवारी रात्री उशिरापर्यंत चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती,शासकीय रुग्णालयात श्रीपाद कवडेला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment