विदर्भ

जप्त रेती साठ्याच्या लिलावासाठी

अमरावती – जप्त रेती साठ्याच्या लिलावासाठी इच्छुकांकडून उपविभागीय अधिकारी, अचलपूर यांच्या कार्यालयामार्फत प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. जप्त करण्यात आलेल्या साठ्याची किंमत अपसेट प्राईज प्रति ब्रास ६०० रुपये असून एकूण अपसेट रक्कम ९ लक्ष ७८ हजार घोषित करण्यात आली आहे. जप्त रेतीसाठ्याच्या घोषित हातच्या किमतीनुसार जाहीर लिलाव उपविभागीय अधिकारी अचलपूर यांच्या दालनात शुक्रवार, दि. ६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे.

मौजा भुगांव ता. अचलपूर जि. अमरावती येथील गट नं ३३४ येथील वासणी मध्यम प्रकल्पाचे बुडीत क्षेत्रातील पिली नदीच्या खोलीकरण व रुंदीकरणातून अंदाजे १ हजार ६३० ब्रास रेतीसाठा आढळून आल्यावरुन उपविभागीयस्तरीय व तालुकास्तरीय विशेष पथकामार्फत कार्यवाही करण्यात येवून या कार्यवाही दरम्यान सदरचा साठा जप्त करण्यात आला आहे.

जाहीर लिलावात सहभागी होणाऱ्या व्यक्ती, संस्था व शासकीय विभाग यांना लिलावात सहभागी होण्यासाठी अर्जासोबत ई-मेल आयडी, पॅनकार्ड, जीएसटी नंबर, करारपत्रक, रहिवासाचा पुरावा व आयकर भरणा करत असल्याचा पुरावा इत्यादी दस्ताऐवज सादर करावे लागतील. तसेच लिलावासाठी भरावयाची इसारा रक्कम व इतर सर्व रकमा धनादेशाव्दारे भराव्या लागतील. इसारा रक्कम वगळून अपसेट प्राईजच्या २५ टक्के रक्कम भरावी लागेल. लिलावात सर्वोच्च बोली ज्यांच्या नावे मंजूर होईल, त्यांना मंजूर रकमेवर शासन निर्णयानुसार आयकर २ टक्के जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी (लिलाव रकमेच्या १० टक्के) विहित मुद्रांक शुल्क भुपृष्ठ भाडे भरावे लागेल.

जाहिरनामा प्रसिध्द झाल्यानंतर दि. ६ जानेवारी रोजी प्रस्तावित लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी व्यक्ती, संस्था व शासकीय विभाग यांनी दि. ६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेपूर्वी शासकीय कार्यालयीन वेळेत उपविभागीय अधिकारी कार्यालय, अचलपूर येथे नाव नोंदविणे, धनादेश सादर करणे बंधनकारक राहील, असे अचलपूरचे उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी कळविले आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment