महाराष्ट्र

ज्येष्ठ नेते एन डी पाटील यांचे कोल्हापुरात निधन

ज्येष्ठ नेते रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन पुरोगामी विचारवंत अन्यायग्रस्ताचा आवाज व शेकापचे माजी आमदार पाटील यांचे प्रकृती अस्वास्थ्यामुळे कोल्हापुरात निधन झाले.

वयाच्या 93 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. 11 जानेवारी रोजी त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वृद्धापकाळाने आज सोमवारी दुपारी 12 वाजता त्यांचे निधन झाले. कोल्हापुरातील सरस्वती हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी पाटील यांचे निधन झाल्याची अधिकृत माहिती दिली


उच्च रक्तदाब मधुमेह हृदयविकार याचा त्यांना गेल्या काही दिवसांपासून त्रास होता 11 जानेवारीला त्यांना बोलण्यामध्ये अडथळा येऊ लागला त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं सिटी स्कॅन केल्यानंतर वैद्यकीय उपचार सुरू करण्याचा निर्णय घेतला मात्र तेव्हापासून त्यांची प्रकृती खालावत होती 14 जानेवारी रोजी त्यांचा रक्तदाब कमी व्हायला सुरुवात झाली तसेच त्यानंतर त्यांची शुद्ध हरपली ्या वेळी डॉक्‍टरांनी त्यांना त्यांच्यावर वैद्यकीय उपचार न करण्याचा निर्णय घेतला त्यांना व्हेंटिलेटर किंवा डायलेसिस करण्यात आलं नाही आज सोमवारी सकाळी ते पूर्णपणे बेशुद्ध झाले व रक्तदाब कमी झाला दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला


डॉक्टर पाटील यांच्या पश्चात पत्नी सरोज मुले सुना व नातवंडे असा परिवार आहे पाटील यांच्या निधनाचे वृत्त समजताच कोल्हापुरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी पासून ते सर्वसामान्य नागरिकांनी हळहळ व्यक्त केली कोल्हापुरातील प्रत्येक अन्यायग्रस्त कामगारा चा आवाज बनून पाटील अनेकदा आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले होते कोल्हापुरातील टोल आंदोलनात देखील पाटील यांनी पुढाकार घेतला होता ज्येष्ठ नेते दिवंगत गोविंद पानसरे यांच्या सोबत एन डी पाटील अनेक आंदोलनामध्ये अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यात अग्रेसर होते विविध सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे


गेल्या वर्षी कोरूना काळात डॉक्टर पाटील यांना करण्याचा संसर्ग झाला होता मात्र करून यावर मात करून ते घरी परतले होते गेल्या दीड ते दोन वर्षापासून वृद्धापकाळाने वृद्धापकाळामुळे ते घरातून फारसे बाहेर पडत नव्हते .

सांगलीतील ढवळी गावात एका सामान्य शेतकरी कुटुंबात 15 जुलै 1929 रोजी एन डी पाटील यांचा जन्म झाला पुणे विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र शिक्षण घेतलं 1954 1957 या कालावधीत त्यांना साताऱ्यातील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करण्याची संधी मिळाली तसेच कमवा व शिका योजनेचे प्रमुख म्हणून कार्यरत होते 1948 मध्ये त्यांनी शेख आपमध्ये प्रवेश केला त्यानंतर 1957 ला ते मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस म्हणूनही कार्यरत होते 1960 ते 1980 या कालावधीत ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते यामध्ये एकोणीशे 78 ते 1980 या कालावधीत सहकार मंत्री होते 1985 ते 1990 या काळात ते कोल्हापूर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य राहिले आहेत.

त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीचं मोठं नुकसान झालं आहे. त्यांच्या निधनाने एका युगाचा अस्त झाला आहे.

एन. डी. पाटील यांच्या जीवन चरित्राचा घेतलेला हा आढावा.
संपूर्ण नाव : नारायण ज्ञानदेव पाटील
जन्म : 15 जुलै 1929 – ढवळी ( नागाव ), जि.सांगली येथे अशिक्षित शेतकरी कुटुंबात जन्म,
शिक्षण : एम.ए. ( अर्थशास्त्र ), पुणे विद्यापीठ,1955; एल.एल.बी.( 1962 ) पुणे विद्यापीठ
अध्यापन कार्य
1954- 1957 छत्रपती शिवाजी कॉलेज,सातारा येथे प्राध्यापक तसेच ‘कमवा व शिका’ या योजनेचे प्रमुख व रेक्टर
1960 साली कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज,इस्लामपूर येथे प्राचार्य
शैक्षणिक क्षेत्रातील कार्य

  •  शिवाजी विद्यापीठ – पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य 1962
  •  शिवाजी विद्यापीठ – सिनेट सदस्य 1965
  •  शिवाजी विद्यापीठ – कार्यकारिणी सदस्य 1962-1978
  •  शिवाजी विद्यापीठ – सामाजिकशास्त्र विभागाचे डीन 1976-1978
  •  सदस्य, प्राथमिक शिक्षण आयोग,महाराष्ट्र राज्य 1991
  •  रयत शिक्षण संथेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य- 1959 पासून
  •  रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन – 1990 पासून
     दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ, बेळगाव अध्यक्ष – 1985 पासून
  • राजकीय कार्य
  • 1948 – शेतकरी कामगार पक्षात प्रवेश
  • 1957 – मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस
  • 1960-66,1970-76,9176-82 अशी 18 वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य
  • 1969- 1978, 1985 – 2010 – शे.का.प.चे सरचिटणीस
  • 1978-1980 – सहकारमंत्री ,महाराष्ट्र राज्य
  • 1985-1990- महाराष्ट्र विधानसभा सदस्य (कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधी
  • 1999-2002 – निमंत्रक लोकशाही आघाडी सरकार
  • महाराष्ट्र राज्य सीमाप्रश्न समितीचे सदस्य व सीमा चळवळीचे प्रमुख नेते
  • मिळालेले सन्मान / पुरस्कार
  • भाई माधवराव बागल पुरस्कार -1994
  • स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ,नांदेड – डी.लीट.पदवी, 1999
  • राष्ट्रीय बियाणे महामंडळ ( अध्यक्षपद )भारत सरकार – 1998 – 2000
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – डी.लीट.पदवी, 2000
  • विचारवेध संमेलन ,परभणी अध्यक्षपद- 2001
  • शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – डी.लीट.पदवी
     शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कार
  • भूषविलेली पदे
  • रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य
  • समाजवादी प्रबोधिनी ,इचलकरंजी – उपाध्यक्ष
  • अंधश्रद्धा निमूर्लन समिती,महाराष्ट्र – अध्यक्ष
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी , सातारा – अध्यक्ष
  • जागतिकीकरण विरोधी कृतिसमिती – मुख्य निमंत्रक
  •  म.फुले शिक्षण संस्था ,इस्लामपूर – अध्यक्ष
  •  दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था ,बेळगाव – अध्यक्ष
  • महाराष्ट्र राज्य सीमा प्रश्न समिती – सदस्य
  • प्रसिद्ध झालेले लेखन
  • समाजविकास योजनेचे वस्त्रहरण (पुस्तिका)
  • शेतजमिनीवरील कमाल मर्यादा आणि महाराष्ट्र सरकारचा प्रतिगामी कायदा (पुस्तिका ) 1962
  • कॉंग्रेस सरकार आणि शेतकऱ्यांची लूट (पुस्तिका ) 1962
  • शेतीमालाला किफायतशीर किमतीची हमी आणि घाऊक व्यापाराचे राष्ट्रीयीकरण (पुस्तिका ) 1963
  • वाढती महागाई आणि ग्राहकांची ससेहोलपट ( पुस्तिका ) 1966
  • महाराष्ट्र सरकारच्या श्वेतपत्रिकेचे ( White Paper ) कृष्णस्वरूप (पुस्तिका) 1967
  • शेतीमालाच्या किफायतशीर किमतीची कैफियत ( पुस्तक ) 1970
  • शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी ? ( पुस्तिका ) 1992
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ( पुस्तिका )
  • नववे विचारवेध संमेलन परभणी, अध्यक्षीय भाषण ,
  • 2001(नवसाम्राज्यवादी युगातील भारतीय लोकशाही समोरील आव्हाने )
  • रयत शिक्षण संस्थेतील विशेष कार्य
  • चेअरमन पद काळात: औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आश्रमशाळा,साखरशाळा,नापासांची शाळा,श्रमिक विद्यापीठ,संगणक शिक्षक केंद्र,कर्मवीर भाऊराव पाटील इन्फर्मेशन अॅण्ड टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूट, ‘कमवा व शिका’ या योजनेवर भर ,स्पर्धा परीक्षा केंद्रे ,गुरुकुल प्रकल्प,लक्ष्मीबाई पाटील शिष्यवृत्ती योजना, सावित्रीबाई फुले दत्तक – पालक योजना यांची राबणूक, दुर्बल शाखा विकास निधी,म.वि.रा.शिंदे अध्यासन केंद्रे आदींची स्थापना, कर्मवीर विद्याप्रबोधिनीमार्फत विविध पुस्तकांची निर्मिती.
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी,समाजवादी प्रबोधिनी,अंधश्रद्धा निर्मुलन समिती या संस्थांच्या सहकार्याने विद्यार्थी, शिक्षक -प्राध्यापक प्रबोधन कार्याला चालना

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment