महाराष्ट्र

सात दिवसात सात वाघांचा मृत्यू

चंद्रपूर – वाघांचे मृत्यसत्र थांबता थांबेनासे झाले.अवघ्या सात दिवसात सात वाघांचा मृत्यू झाला.ताडोबाचा बफर क्षेत्रात सहा वाघांचा मृत्यचा अद्याप विसर झालेला नसताना बुधवारला ब्रह्मपुरी वनविभागातील नागभीड वनपरिक्षेत्रातील चिंधीचक जंगलातील हुमा ( किटाळी ) बिट क्रमांक ६४६ मध्ये वाघाचा मृत्यूदेह आढळून आला.या घटनेने एकच खळबळ उडाली.

दोन वाघांच्या झुंजीत या नर वाघाचा मृत्यू झाल्याचा वनविभागाचा अंदाज आहे . हा वाघ सुमारे अडीच वर्षांचा होता . घटनेची माहिती मिळताच नागभीड वनपरिक्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले . वाघाच्या मृतदेहावर मागील बाजूला व गळ्याला गंभीर जखम झाल्याने दोन वाघांचा झुंजीत वाघ ठार झाल्याचे पंचनाम्यात दिसून येते . सकाळी दोन नर वाघांमध्ये झुंज झाली असावी . यामध्ये एका वाघाचा मृत्यू झाल असावा,असा अंदाज वर्तविण्यात आला . ही झुंज सकाळी झाली असावी , असे वाघाच्या मृतदेहावरून दिसून येते , असे वनविभागाचे म्हणणे आहे . अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले .अधिक तपास वनविभाग करीत आहेत .

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment