इंदापूर – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवसापासून बारामती दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी इंदापूर तालुक्यातील बोरी येथील शेतकऱ्यांशी थेट बांधावर जाऊन संवाद साधला. वयाच्या ८२ व्या वर्षीही ते शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याबरोबरच त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचतात म्हणूनच त्यांना शेतकऱ्यांचे कैवारी म्हणूनही संबोधले जाते….
आज दिनांक एक जानेवारी रोजी इंदापूर तालुक्यातील बोरी गावाला भेट दिली. यावेळी बोरी गावच्या ग्रामस्थांकडून पवार यांचे स्वागत करण्यात आले.पवार यांनी बोरी गावातील रामहरी जगताप या शेतकऱ्याच्या द्राक्ष शेती प्लॉटला भेट दिली भेटी दरम्यान त्यांनी माहिती घेऊन विचारपूस केली.
दरम्यान श्रीराम चौक बोरी येथे व गॅलेक्सी फ्रेश कोल्ड स्टोरेज येथे पवार यांचा सत्कार करण्यात आला …रीलायबल कोल्ड स्टोरेज बोरी येथे त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला..बोरी गाव हे द्राक्षांसाठी प्रसिद्ध आहे..येथील द्राक्ष साता समुद्रापार चायना, श्रीलंका, थायलंड, मलेशिया, दुबई आधी देशात बोरीची द्राक्ष मोठ्या प्रमाणात निर्यात होते.
वयाची ८२ पार केल्यावरही तरुणांना लाजवेल असा त्यांचा दिनक्रम सुरू आहे या वयात ही ते थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन त्यांच्या अडीअडचणी समस्या सोडवण्याचे काम करत असल्याचे दिसते म्हणूनच त्यांना जाणता राजा, शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून संबोधले जाते.