कोंकण महाराष्ट्र

शिंदे गटाच्या महिला तालुका प्रमुख पदाचा राजीनाम्याचे पत्र दिल्याने खळबळ

रत्नागिरी – कोकणात रत्नागिरी जिल्हयात उद्धव ठाकरे गटाला ग्रामपंचायत निवडणुकीत चांगले यश मिळाले आहे. रत्नागिरी मध्ये शिंदे गटाच्या महिला तालुकाप्रमुख कांचन नागवेकर यांनाही पराभव पत्करावा लागला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत  पराभूत झाल्याने शिंदे गटाच्या शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याचे पत्र दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी बंडा साळवी यांनी ८० टक्के ग्रामपंचायती ठाकरे गटाकडे आल्याच म्हटले आहे तर हा दावा एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी फेटाळून लावला आहे. दरम्यान पालकमंत्री उदय सामंत हे कांचन नागवेकर यांची भेट घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

रत्नागिरी मध्ये शिंदे गटाच्या  महिला तालुकाप्रमुख कांचन नागवेकर यांच्या राजीनामे एकच खळबळ उडाली आहे. टेंब्ये ग्रामपंचायतिच्या  निवडणुकीत सरपंच पदासाठी उभ्या असलेल्या कांचन नागवेकर याचा पराभव झाल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेच्या त्या रत्नागिरी महिला तालुकाप्रमुख होत्या. गेली दहा वर्ष टेंभे ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदी असलेल्या कांचन नागवेकर यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेचा महिला तालुकाप्रमुख या पदाचा राजीनामा जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांच्याकडे  मंगळवारी दिला आहे.

याबाबत कांचन नागवेकर यांनी सांगितले की मी टेंबे गावातून सरपंच पदासाठी निवडणूक लढवत होते पण या निवडणुकीत मी ३०० मतांनी पराभूत झाल्याने नैतिक जबाबदारी स्वीकारून मी माझ्या पदाचा राजीनामा जिल्हाप्रमुख यांच्याकडे सादर केला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता जिल्हयातील ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर आता पालकमंत्री उदय सामंत त्यांच्याकडुन कोणती प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment