पश्चिम महाराष्ट्र

शिवसागरात स्कूटर बोट पलटी होऊन पर्यटक बुडाला

सातारा – कोयना धरणाचे बॅक वॉटर असलेल्या शिवसागर जलाशयात वॉटर स्कूटर बोट पलटी होऊन कराड तालुक्यातील पर्यटक बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संकेत संग्राम काळे (वय २७, रा. वाठार, ता. कराड , जि. सातारा ), असे पर्यटकाचे नाव आहे. मात्र, अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. म्हावशी (ता. जावळी) हद्दीमध्ये मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली आहे.

बेकायदेशीर टेंन्ट कॅंम्पिंगवर अनधिकृतरित्या चालविली जाणारी ही बोट होती. जावळी तालुका हद्दीत शिवसागर जलाशयालगत असलेल्या एका टेंट कॅम्पिंगवर कराड तालुक्यातील काही पर्यटक पर्यटनासाठी गेले होते. रात्री सातच्या सुमारास वॉटर स्कूटर बोटिंग करत असताना स्कूटर पलटी होऊन संकेत काळे हा पर्यटक पाण्यात बुडाला. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर महाबळेश्वर ट्रेकर्सना पाचारण करण्यात आले. शोधमोहीम सुरू करण्यात आली. मात्र, अंधारामुळे शोधकार्य थांबविण्यात आले.

एका कंपनीतील आठ जण पर्यटनासाठी गेले होते. शिवसागर जलाशयात रात्री सातच्या सुमारास ते वॉटर स्कूटर बोटिंग करत असताना त्याची स्कूटर अचानक पलटी झाली. या दुर्घटनेत कराडमधील पर्यटक शिवसागर जलाशयात बुडाला. या प्रकाराची माहिती मेढा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महाबळेश्वर ट्रेकर्सना पाचारण करून शोधमोहीम सुरू केली. मात्र, बुडालेल्या पर्यटकाचा शोध लागला नाही. आज पुन्हा शोधमोहीम राबविण्यात येणार आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment