कोंकण महाराष्ट्र

विद्युत वाहिनीच्या डिपीवर चोरीच्या उद्देशाने चढलेल्या युवकाचा शॉक लागून मृत्यू

महाड – कोकणात रायगड जिल्हयात महाड तालुक्यातील भोर पुणे रस्त्यावरील कांबळे गावच्या हद्दीत बस स्टॉप जवळ महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरचा शॉक लागून चिकटल्याने एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. वीजेच्या डीपीवरती चोरीच्या उद्देशाने हा युवक चढल्याचा आता स्पष्ट झाले आहे. ही चोरी करत असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला या मृत इसमाची ओळख ही पटत नव्हती. नंतर या इसमाची ओळख पटली आहे. मोहम्मद इरशाद अहमद वय २८, रा आदर्शनगर, (कुंभारवाडी बिरवाडी ता. महाड) मुळचा आलिनगर मुबारकपुर जि.आजमढ रा. उत्तरप्रदेश असे त्याचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी या घटनेचे वृत्त कळताच महाड एमआयडीसीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांनी घटनास्थळी भेट दिली

शुक्रवारी २७ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा शॉक इतका जबरदस्त होता की सदर युवकाचा अक्षरश: जळून जाग्यावरच कोळसा झाला आहे. त्यामुळे त्याची ओळख पटवणे देखील कठीण होऊन बसले होते. हा युवक या डीपीवर कशासाठी चढला होता याची माहिती सुरवातीला कळू शकली नव्ह्ती. घटनास्थळी इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर चे पार्ट आढळून आले असल्याने तो चोरीच्या उद्देशाने हा युवक ट्रान्सफॉर्मर वर चढला असावा असा प्राथमिक अंदाज होता. त्यानुसार ट्रान्सफॉर्मरमधील कॉपर कॉईल करण्याचे उद्देशाने हा तरुण डीपीवरती चढला होता अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. मृत्यू झालेल्या मोहम्मदच्या मृतदेहावरती बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवविच्छेदन केल्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. महमद हा फेब्रिकेशनची काम करत होता तो गेली  १५ वर्षे बिरवाडी परिसरात राहत होता. या सगळ्या धक्कादायक घटनेची नोंद महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हवालदार सोनाली नितेश उमरटकर यांनी केली आहे.या घटनेचा अधिक तपास महाड एमआयडीसीचे पोलीस नाईक पांडुरंग शास्त्री करत आहेत.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment