मुंबई – मुंबईच्या मानकूर गोवंडी परिसरात राहणा-या आदित्य बरर याचे कल्याण विठ्ठलवाडी परिसरातील राहणा-या एका तरुणीसोबत प्रेमप्रकरण सुरु होत…मात्र अस असलं तरी याच तरुणीचे आदित्य अगोदर ललित नावाच्या मुलाशी प्रेमप्रकरण सुरू होते..हे रिलेशन जवळपास चार वर्षे सुरू होत. मात्र या नात्यात मध्ये आलं ते ललितच व्यसन..या व्यसनामुळे तरुणीच्या आईने तिला दिव्यात आपल्या भावाजवळ पाठवले.. यादरम्यान ती आदित्यच्या संपर्कात आली..ही जवळीक वाढत गेली आणि या दोघांच प्रेम प्रकरणं सुरू झालं…या दरम्यान गेले दोन दिवसा पूर्वी तरुणीची आई जेजुरीला देवदर्शनासाठी गेली …व तरुणीला घरातला कुत्रा घेऊन जाण्यास सांगितला …हा कुत्रा घेण्यासाठी आदित्य व तरुणी विठ्ठलवाडी परीसरात आले …या दोघाना एकत्र पाहून पहिला प्रियकर म्हणजेच ललित चा राग अनावर झाला..त्याने व त्याच्या मित्रांनी आदित्यवर हल्ला केला..या मारहाणीत आदित्यचा जागीच मृत्यू झाला…त्या नंतर आरोपी तेथून फरार झाले …याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस तपास करत असून आरोपीचा शोध सुरू आहे.