मुंबई

पेणमध्ये धक्कादायक घटना, बसमध्ये कंडक्टरने केला महिलेचा विनयभंग

नवी मुंबई – दिवसेंदिवस महिलांवर होणारे अत्याचार वाढत चाललेले आहे. दिवस उजेडताच महिलांनाच्या अत्याचाराविषयी चित्र विचित्र बातम्या ऐकायला येतात. देशाला स्वातंत्र्य मिळाले मात्र महिलांना आजूनही स्वातंत्र्य मिळालेले दिसत नाही, कोपर्डी दिल्ली सारख्या घटना घडतात मात्र अजूनही अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला पाहीजे तशी शिक्षा दिली जात नाही म्हणूनच की काय महिलांवर होणाऱ्या अत्याचाऱ्याच्या घटना ह्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे. पनवेल रोहा बसमधील एक धक्कादायक घटना समोर आली असून ह्या घटनेमध्ये महिलेचा बिनयभंग हा बसमधील कंडक्टराने केला असल्याचे समजताच संपूर्ण परिसरामध्ये संताप जनक वातावरण निर्माण झाले आहे.

पीडित महिलाही पनवेल पेन या बसने प्रवास करत होती रात्रीच्या वेळी संधी साधून यावाहकाने महिलेच्या अंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला महिलेने वाहकाला धक्का देऊन बाजूला सारले असता त्यांनी सावरा सावर करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर बस थोड्या अंतरा जवळ म्हणजेच पेन जवळ आली असताना पुन्हा एकदा आरोपीने महिलेला गुप्तांग दाखवलें आणि आशिअल चाळे केले. या घटनेमधील आरोपी वाहक एस बी शिंदे यांच्या विरोधात पेन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनवेल रोहा बस मधील ही घटना घडल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. एस बी शिंदे असा आरोपीचे नाव असून या प्रकरणात आरोपी विरोधात पेन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे मात्र या घटनेमुळे आता पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. अनेक पुरुष हे महिला एकटी दिसल्यावर तिचे रक्षण करायचे सोडून तिच्याकडे वाकडी नजर टाकून नको ते चाळे करतात. मात्र अद्याप तरी आपल्या समाजामध्ये अशा निर्दयी पुरुषांना कडक शिक्षा दिली जात नाही त्यामुळेच येणाऱ्या काळात महिलांच्या सुरक्षेचे काय असा प्रश्न उपस्थित राहत आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment