मनोरंजन

त्या तरुणीमुळे उडाली अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची भीतीने गाळण

फॅन असलेल्या एका मुलीने मात्र सिद्धार्थची  भीतीने गाळण उडवली होती.  सिद्धार्थ मुळचा पुण्याचा.  सहकारनगरमध्ये सिद्धार्थचे जे घर आहे त्याच्या गॅलरी पासून समोर असलेला रस्ता हा डेडएंड आहे.   त्याठिकाणी फारशी वर्दळ नसते. सिद्धार्थच्या बेडरूमला लागून ही गॅलरी असल्यामुळे सिद्धार्थला या गॅलरीतून तो निर्जन रस्ता बघायची खूप सवय आहे.

By: अनुराधा कदम

सेलिब्रिटी कलाकारांना नेहमीच त्यांचा फॅन फॉलोइंग वाढावा असे वाटत असते.  वेगवेगळ्या भूमिकेवर फिदा होऊन त्यांचे चाहते त्यांना भेटायला येत असतात, गिफ्ट देत असतात. अशा गिफ्टस् आणि किस्से कलाकार त्यांच्या सोशल मीडिया पेजवर शेअर करत असतात. पण एखादी चाहती कलाकाराला भीती वाटावी इतपत जर त्याच्या मागे लागली तर काय घडू शकतं हे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने शेअर केलं. एका खास मुलाखतीच्या निमित्ताने फॅनक्लबचा विषय निघाला तेव्हा सिद्धार्थला त्या घाबरून सोडणाऱ्या चाहती विषयी बोलण्याचा मोह आवरला नाही.

सध्याच्या चॉकलेट हिरोच्या पंक्तीत सिद्धार्थ चांदेकर हे नाव आता वरच्या क्रमांकावर आहे. त्यामुळे साहजिकच सिद्धार्थच्या फॅन क्लब मध्ये मुलींची संख्या खूप आहे.  सिद्धार्थलाही  त्याच्या फॅन फॉलोइंग मध्ये असलेल्या तरुणींची संख्या पाहून आवडतं  हे तो त्याच्या मुलाखतीत सांगत असतो.  

जेव्हा आपल्यावर तरुणी फिदा असतात हे फिलिंग कलाकार म्हणून नक्कीच माझ्यासाठी खूप छान आहे असं सिद्धार्थ सांगतो. पण अशा फॅन असलेल्या एका मुलीने मात्र सिद्धार्थची  भीतीने गाळण उडवली होती.  सिद्धार्थ मुळचा पुण्याचा.  सहकारनगरमध्ये सिद्धार्थचे जे घर आहे त्याच्या गॅलरी पासून समोर असलेला रस्ता हा डेडएंड आहे.   त्याठिकाणी फारशी वर्दळ नसते. सिद्धार्थच्या बेडरूमला लागून ही गॅलरी असल्यामुळे सिद्धार्थला या गॅलरीतून तो निर्जन रस्ता बघायची खूप सवय आहे.

 सिद्धार्थ सांगतो मी नेहमी माझ्या गॅलरीत ब्रश करत सकाळी उभा असायचो तेव्हा एकदा कुरळ्या केसांची आणि दाताला क्लिप असलेली एक मुलगी मला त्या रस्त्यावर उभी असलेली दिसली. ती एकटक माझ्याकडे बघत होती म्हणून मी तिला हाताने हाय केलं पण त्यावर तिने कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.

मी तो विषय सोडून दिला पण त्यानंतर पुढचे अनेक दिवस माझ्या ब्रश  करण्याच्या सकाळच्या वेळेत त्याच ठिकाणी ती उभी असायची आणि माझ्याकडे बघत असायची. केस सोडलेले, दाताला क्लिप यामुळे एकदम तिचं रूप वेगळंच दिसायचं. सतरा अठरा वर्षाची ती मुलगी होती आणि तिचं हे सतत त्या ठिकाणी उभे असणं नंतर नंतर मला खूप विचित्र वाटायला लागलं. एकदा मी माझ्या मित्रांसोबत अलिबागला गेलो होतो तिथे आम्ही एका रिसॉर्टमध्ये मजा करत बसलो असताना समोर ती मुलगी मला दिसली आणि मी खरच घाबरून गेलो.

एका पॉईंटवर मला असं वाटायला लागलं की ती प्रत्यक्ष मुलगी नसून ती कदाचित भूत असेल आणि ती माझा पिच्छा करतेय. बर ती कधीच माझ्याशी येऊन बोलायची नाही. मी हाय केलं तर त्याला कधी प्रतिसाद द्यायची नाही.  त्यानंतर मी पुण्याला आलो तर दुसर्‍याच दिवशी पुन्हा माझ्या गॅलरी समोरच्या रस्त्यावर ती उभी होती.

खूप धीर एकवटून मी खाली गेलो आणि तिला गाठलं आणि तिला म्हणालो कि इतके दिवस तू रोज माझ्या घरासमोर उभी राहतेस , मी अलिबागला गेल्यानंतर तिथे मला दिसतेस, माझ्या नाटकाच्या प्रयोगादरम्यान नाट्यगृहाबाहेर माझ्यासमोर येतेस. हे सगळे काय आहे ? तुला माझ्याकडून काय हवंय? तेव्हा ती पहिल्यांदा माझ्याशी बोलली आणि मला म्हणाली की, मला तुम्ही खूप आवडता.

पण हे तुम्हाला सांगायचं धाडस माझ्याकडे नव्हतं . कदाचित तुम्हाला हे आवडलं नाही तर तुम्ही माझ्यावर रागवाल म्हणून मी काहीच बोलले नाही. तिच्या या बोलण्याने  मी अक्षरशः निश्वास सोडला होता. म्हणजे आपल्याला छान छान गिफ्ट देणारेच फॅन असतात असं नाही तर आपल्याला घाबरून सोडणारीदेखील फॅन असते. पण तिचा निरागसपणा मला फार आवडला आणि त्याच्यानंतर मी तिला असे सांगितले की तुला कधी माझ्याशी बोलाव वाटलं तर नक्की बोल.

मी तुझ्याशी बोलेन पण अशा पद्धतीने तू एखाद्या ठिकाणी येऊन थांबू नकोस. तिलाही ते पटलं आणि मग त्यानंतर ती मला अशी माझ्या गॅलरीसमोर रस्त्यावर कधीच दिसली नाही.  सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी अलिबागला गेलो होतो तेव्हा ती तिच्या मैत्रिणींबरोबर अलिबागला येणं हा योगायोग होता. ती माझ्यासाठी  आली नव्हती हेदेखील तिने मला सांगितलं तेव्हा कुठे माझा जीव भांड्यात पडला.

 सिद्धार्थने सांगितलेला हा किस्सा सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे.  सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांचा विवाह झाला आहे. . सांग तू आहेस का या मालिकेत सिद्धार्थला त्याच्या चाहत्यांकडून चांगला प्रतिसादही मिळाला आहे.  त्याचा झिम्मा हा सिनेमा  मोठ्या पडद्यावर  हिट झाला आहे  . तसेच एका वेबसीरिजमध्ये ही तो काम करतोय. या वर्षात त्याच्या  दोन्ही वेगळ्या माध्यमातल्या भूमिका त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहेत.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment