विदर्भ

डॉ.बाबासाहेबांना वाहिली भावपूर्ण मूक श्रद्धांजली

चांदुर- ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त मिलिंद नगर बुद्ध विहार येथून भारतरत्न, महामानव , बोधिसत्व अशा अनेक पदव्यांनी विभूषित डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची चांदुर रेल्वे येथील मिलिंद नगर वासियांनी काढली शांतता रॅली. यावेळी बौद्ध अनुयायांनी पांढरे कपडे परिधान करून ओम नमो बुद्धाय शांतीपाठ असा जयघोष करत नगर परिषदेजवळ पोहोचून बुद्धाची आराधना करून भावपूर्ण मूक श्रद्धांजली वाहिली. या कार्यक्रम प्रसंगी माजी नगराध्यक्ष शिट्टू सूर्यवंशी, उपाध्यक्ष देवानंद खुणे, हर्षल वाघ, पत्रकार प्रवीण (गुड्डू) शर्मा आदी उपस्थित होते. अभिजित तिवारी, चेतन भोळे, पंकज मेश्राम यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.पंचशील स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष प्रफुल्ल मकेश्वर आणि सर्व युवा सदस्य, माजी नगरसेवक अनिल आठवले, बंडूभाऊ आठवले, सतपाल वरठे, सदस्य बबन सुळे, बाबा वानखेडे आदी उपस्थित होते. अजय राऊत, राजू नितनवरे, गोलू पाटील, देवा आठवले, अक्षय तसरे, गोलू जवंजाळ संतोष वानखडे, धीरज गवई, सिद्धार्थ दाभाडे, अक्षय तसरे मातोश्री रमाबाई महिला मंडळ, युवक, युवती, उपासिका व उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment