कोंकण

सिंधुदुर्ग जिल्ह्यात १४ कुपोषित बालके

सिंधुदुर्ग जिल्ह्यात १४ कुपोषित बालके

विवेक ताम्हणकर, कोंकण

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९६० बालके कमी वजनाची, तर ५४ बालके तीव्र कमी वजनाची अशी एकूण एक हजार १४ कुपोषित बालके आहेत. जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागाकडून ही माहिती देण्यात आली.

जिल्ह्यात शून्य ते सहा वयोगटातील ३७ हजार ७६६ बालके आहेत. या बालकांपैकी ३७ हजार ७४४ बालकांचे मार्चअखेर वजन घेण्यात आले.

जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील मिळून मार्चअखेर कमी वजनाच्या बालकांची संख्या ९६० आहे. यापैकी १३० बालकांमध्ये सुधारणा झाली; तर तीव्र कमी वजनाच्या बालकांची संख्या ५४ एवढी आहे. यापैकी १३ बालकांमध्ये सुधारणा दिसून येत असल्याचे महिला व बालविकास विभागाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यात मार्चअखेर कमी वजनाच्या बालकांची संख्या ९६० आहे. यापैकी १३० बालकांमध्ये सुधारणा झाली. कुडाळ तालुक्यातील कमी वजन असणाऱ्या बालकांचा आकडा २०० हून अधिक आहे. कमी वजन असणाऱ्या बालकांमध्ये सावंतवाडी १५६, कणकवली १३१, मालवण १०३, वेंगुर्ले १०६, कुडाळ २२२, वैभववाडी ३६, देवगड १४६ व दोडामार्ग तालुक्यातील ६० बालकांचा समावेश आहे. यापैकी १३० बालकांमध्ये सुधारणा झाली.

यात सावंतवाडी १५, कणकवली १५, मालवण ३, वेंगुर्ले २४, कुडाळ ३८, वैभववाडी ७, देवगड १८ व दोडामार्ग तालुक्यातील १० बालकांचा समावेश आहे. जिल्ह्यात मार्चअखेर तीव्र कमी वजन असलेल्या (सॅम) बालकांची संख्या ५४ आहे. यापैकी १३ बालकांमध्ये सुधारणा झाली.

तीव्र कमी वजन असणाऱ्या बालकांमध्ये सावंतवाडी १४, कणकवली ४, मालवण ८, वेंगुर्ले २, कुडाळ १४, वैभववाडी ३, देवगड ७, दोडामार्ग तालुक्यातील दोन बालकांचा समावेश आहे. यापैकी १३ बालकांमध्ये सुधारणा झाली. यात सावंतवाडी २, कणकवली २, मालवण ३, वेंगुर्ले १, देवगड तालुक्यातील ५ बालकांचा समावेश आहे.

जिल्ह्यात एक हजार ५९३ कार्यरत अंगणवाडी केंद्रे असून, आठही तालुक्यांतील मिळून शून्य ते सहा वयोगटातील ३७ हजार ७६६ सर्वेक्षित बालकांपैकी ३७ हजार ७४४ बालकांचे मार्चअखेर वजन घेण्यात आले.

यात सावंतवाडी तालुक्यातील सहा हजार ३५७, कणकवली- सहा हजार ६३७, मालवण- तीन हजार ७५६, वेंगुर्ले- तीन हजार ३०५, कुडाळ- सात हजार ८८१, वैभववाडी- एक हजार ८८८, देवगड- पाच हजार ३४२, दोडामार्ग- दोन हजार ५७८ बालकांचा समावेश असून, यात तीव्र व कमी वजनाची मिळून एक हजार १४ बालके असल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment