कोंकण महाराष्ट्र

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची यशस्वी घौडदौड

सिंधुदुर्ग (महेश सावंत, पत्रकार )- सहकार चळवळ आज महाराष्ट्रात मागे पडली असतानाच सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करत आहेत. सहकारात नको ती माणसे शिरली की बट्ट्याबोळ कसा होता याची अनेक उदाहरणे देता येतील. गाडी कशी आहे त्यापेक्षा गाडीचे सारथ्य कोण करत याला ही फार महत्व आहे. सारथी योग्य सापडला तर लक्ष गाठणे कठीण नसते. याच उत्तम उदाहरण म्हणजे आपली जिल्हा बँक आणि त्याचे संचालक मंडळ.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची नुकतीच वर्षपूर्ती झाली. मनीष दळवी आणि त्यांची टीम बँकेला शिखरावर घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील आहेत. संचालक मंडळाची निवडणूक झाल्यानंतर पदाधिकारी कोण असतील याबाबत अनेक तर्कवितर्क त्यावेळी लढवले गेले. अनेक नावे पुढे आलीत. बँकेचे अध्यक्षपद भूषविणे हे वाटतं तितकं सोपं नाही. याची पूर्ण जाण असलेल्या नारायण राणे यांनी अध्यक्ष पदाची माळ मनीष दळवी यांच्या व उपाध्यक्षपदाची माळ अतुल काळसेकर यांच्या गळ्यात घातली. अर्थात त्यावेळेला दबक्या आवाजात उलट सुलट चर्चा होत होत्या. कृषी उत्पन्न बाजार समितीचा तुटपुंजा अनुभव असलेल्या दळवींना ही जबाबदारी झेपेल का? अस बहुतेक सर्वानाच वाटत होतं. पण काही माणसे ही संधी मिळताच त्याचे सोनं करणारी असतात. मनीष ही त्यातीलच एक निघाले. अर्थात दाद द्यायला हवी ती नितेश राणेंच्या पारखी स्वभावाला ही. नितेश राणेंना त्यावेळी अनेकांच्या नाराजीला सामोरे जावे लागले असणार हे काही सांगण्याची गरज नाही.

मनीष दळवी…. अतिशय शांत,संयमी,मितभाषी आणि अभ्यासू चेहरा. सहकारासारख्या क्षेत्रात हा चेहरा आता पूर्ण रुजलाय असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही. जोडीला अतुल काळसेकर यांच्यासारख्या मुरब्बी जोडीदार व कर्तव्यदक्ष कर्मचारी- अधिकारी वर्ग व तितकेच सहकार्य करणारे इतर संचालक मंडळ. वर्षपूर्तीत बँकेने घेतलेली उडी ही डोळे विस्फारणारी आहे. अर्थात त्याआधी ही बँकेचा आलेख चढताच होता मात्र या नवीन संचालक मंडळाने शिखर गाठण्याचा केलेला प्रयत्न अभिनंदनीय आहे. बँकेला सन्मानाच्या स्थानावर नेण्यासाठी यांनी केलेले प्रयत्न ,त्यासाठी आणलेल्या योजना उल्लेखनीय आहेत. जिल्हा बँक म्हंटल्यावर फक्त शेतकऱ्यांची बँक अशी धारणा असते. पण या धारणेला छेद देत या नूतन संचालक मंडळाने जिल्हा बँक म्हणजे शेतकऱ्यांबरोबरच, महिलांची,तरुणांची,कारागीरांची, मजुरांची,बेरोजगारांची,नवं उद्योजकांची….समाजातील प्रत्येक घटकाची, अशी नवीन ओळख दिली.या सर्वांसाठी गेल्या वर्षभरात अनेक नवनवीन योजना,निर्णय घेण्यात आले.

महाराष्ट्रातील पहिल्या तीन क्रमांकात बँकेची गणना व्हावी म्हणून संचालक मंडळासह कर्मचारी वर्ग नेहमीच मेहनत घेत असतो. कक्षेच्या बाहेर जाऊन काम करण्याचा केलेला प्रयत्न बँकेचे अढळ स्थान अबाधित राखल्याशिवाय राहणार नाही. झपाट्याने होणारे बदल जाणून जिल्हा बँकेने डिजीटल बँकिंगवर भर दिला आहे. येणाऱ्या काळात ३०० मायक्रो एटीएम उभारणी आणि डोअर स्टेप बँकिंग या बँकेच्या दोन अभूतपूर्व योजना राबवल्या जाण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत. अशा योजना राबविणारी सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही महाराष्ट्रातील पहिली जिल्हा बँक ठरणार आहे. राज्यातल्या आघाडीच्या वृत्तवाहिन्यांनी ही याची दखल घेतली आहे. मनीष दळवी आणि त्यांच्या टीमने जसा आपल्या नेत्यांचा विश्वास संपादन केला तसाच जिल्ह्यातील जनतेचा ही विश्वास संपादन केला आहे. त्यामुळेच सिंधू धनवृद्धी विशेष ठेव योजनेच्या माध्यमातून दिवसाला १० कोटींपेक्षा जास्त ठेवी जमा होत आहेत. मागील वर्षभरात २२३ कोटीने ठेवी वाढल्या आहेत. ही साधी सोपी गोष्ट नाही. आपले पैसे,आपली पुंजी योग्य व्यक्तींच्या हाती सोपवत आहोत हा विश्वास निर्माण झाल्यामुळेच हे शक्य झालं आहे.

अजून अनेक नवनवीन योजना आकार घ्यायचा आहेत. अपार कष्ट,मेहनत आणि ग्राहकसेवा प्रमाण मानून प्रवास सुरु आहे. वर्षभरातला वेग आणि अचिव्हमेंट पाहता बँकेचा प्रवास हा सुखकर,अभिनंदनीय आणि सर्वोच्च ठरणार यात शंका नाही. सारथी चांगले आहेतच पण नियंत्रण कक्षातूननारायण राणे,रवींद्र चव्हाण,नितेश राणे यांची ही नजर आहे त्यामुळे जहाज भरकटण्याची शक्यता तिळमात्र नाही.मनीष दळवी आपणास व आपल्या टिमला आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment