औरंगाबाद – अभ्यासाच्या तणावातून बी. एस्सी तृतीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गळफास घेतल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे बहीण घरात असे पर्यंत त्याने हसून खेळून बोलला मात्र बहीण ट्यूशन जाताच टोकाचं पाऊल उचलले. वैभव नारायण खंडागळे वय -२१ (रा.मयूर नगर,औरंगाबाद ) असे मृत विद्यार्थाचे नाव आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, मयूर हा एम.जी.एम महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात शिकत होता. त्याचे वडील कंपनीत कामगार आहेत. रविवारी सुट्टी असल्याने त्याचे आई – वडील जळगाव जिल्ह्यात देवदर्शनासाठी गेले होते. घरी दोन्ही भाऊ – बहिनच होते. दुपारी बहीण ट्यूशनला गेल्या नंतर वैभव ने घरातील समोरील दरवाज्याला बाहेरून कुलूप लावले. व मागील दरवाज्याने घरात जाऊन गळफास घेतला. संध्याकाळी बहीण ट्यूशन ने आल्यानंतर तिला घराला कुलूप दिसल्याने ती मावशीकडे गेली. मात्र रात्री दहाच्या दरम्यान जेंव्हा आई वडील घरी आले.त्यांनी स्वतः जवळील चावीने दरवाजा उघडला आता तेंव्हा वैभवने गळफास घेतल्याचे दिसले. त्यांनी फासावरून खाली उतरवत रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. गेल्या सेमीस्टर मध्ये त्याच एक विषय राहिला असल्याने तो तणावात होता. अभ्यासाच्या ताणातून त्याने आत्महत्या केली असावी अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सह्यक फौजदार गरड करीत आहे.