पश्चिम महाराष्ट्र

शाहू विचार प्रसार परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर – शालेय जीवनातच विद्यार्थ्याना राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि त्यांच्या कार्याची माहिती व्हावी, या उद्देशाने गेली पंधरा वर्षे छत्रपती शाहू फाउंडेशन विविध उपक्रम राबवत आहे. दरवर्षी जिल्ह्यातील आणि जिल्ह्या बाहेरील शालेय विद्यार्थ्यांची राजर्षि शाहू विचार, प्रचार आणि प्रसार परीक्षा घेतली जाते. याही वर्षी या परीक्षा घेण्यात आल्यां. मोठ्या प्रमाणात आपला सहभाग दर्शवत विद्यार्थ्यानी या उपक्रमास आपला प्रतिसाद दिला. बुधवारी या उपक्रमाच्या आयोजनाचा अखेरचा टप्पा म्हणून वारणा नगर परिसरातील ए बी पी शिक्षण समुहाच्या प्रशालेमध्ये राजर्षी शाहू विचार, प्रचार, प्रसार परीक्षा घेण्यात आली. या समुहाच्या प्राथमिक आणि माध्यमिक विभागामधील सहाशे विद्यार्थ्यानी यात आपला सहभाग नोन्दवला. फाउंडेशनचे संस्थापक जावेद मुल्ला ,अध्यक्ष प्रा. जॉर्ज क्रुझ यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या स्वयंसेवकानी यासाठी परिश्रम घेतले . पुढील महिन्यात या परिक्षेतील गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा होणार आहे .

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment