पश्चिम महाराष्ट्र

शल्यचिकित्सकांना कर्मचाऱ्याकडून मारहाण

सातारा – येथील दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सकांना एका कर्मचाऱ्याने शिवीगाळ करत मारहाण केली आहे. रुग्णालयातील हिवताप विभागातील कर्मचारी राहुल जगताप याने मारहाण केल्यानंतर त्याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हा शासकीय रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण हे आपल्या विभागात गुरुवार (दि. १५) रोजी दुपारच्या सुमारास काम करत होते. यावेळी हिवताप विभागातील कर्मचारी राहुल जगताप हा गेला. तसेच “माझ्या विरोधात आपण सतत बोलत असता,” असे म्हणत रागाने चिडून जाऊन डॉ. चव्हाण यांना त्याने शिवीगाळ करत मारहाण केली.

डॉ. चव्हाण यांना करण्यात आलेल्या मारहाणीनंतर या घटनेचा जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी निषेध केला आहे. या घटनेनंतर सातारा शहर पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी व मारहाण केल्या प्रकरणी जगताप याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलिस उपनिरीक्षक मुसळे अधिक तपास करत आहेत.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment