पश्चिम महाराष्ट्र

स्टेअरिंग वरून कळालं मुख्यमंत्री कोण – अमोल मिटकरी

सोलापूर – विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी हे सोलापूर येथील बक्षी हिप्परगा येथील शेतकरी मेळाव्यासाठी सोलापुरात आले होते. शासकीय विश्रामगृह येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांवर निशाणा साधला आहे. समृद्धी महामार्गावर देवेंद्र फडणवीस यांनी स्टेअरिंग हातात घेऊन वाहन चालवले होते. हे सर्व महाराष्ट्र राज्याने पाहिले आहे,यावरून असे दिसून येत आहे की, राज्याचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे नसून देवेंद्र फडणवीस हेच आहेत.

विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी हे सोलापुरातील बक्षी हिप्परगा येथील शेतकरी मेळाव्याला आले होते. शेतकऱ्यांची बाजू मांडत अमोल मिटकरीनी देवेंद्र फडणवीसवर टीका केली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्यातील शेतकऱ्यांची ससेहोलपट झाली होती. तसेच भाजप पक्ष महाराष्ट्र राज्यात सीमावाद निर्माण करत आहे असे अमोल मिटकरी म्हणाले.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment