कोंकण महाराष्ट्र

खोपोलीजवळ विद्यार्थ्यांच्या बसला अपघात, दोघांचा मृत्यू

रायगड : मुंबई – पुणे एक्स्प्रेस वे वर खोपोली परिसरात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस उलटली गंभीर अपघात झाला आहे. या बस मध्ये ४८ विद्यार्थी होते. ही बस चेंबूर येथून वेट अ‍ॅण्ड जाॅयला आले होते. चेंबूर येथे परतत असताना हा अपघात झाला आहे. या अपघातात २ विद्यार्त्यांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे.

खोपोली हद्दीमध्ये हा अपघात झाला असून. विद्यार्थी जखमी झाले आहेत. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून स्थानिक आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चेंबूरमधील एका क्लासचे विद्यार्थी सहलीसाठी खोपोलीला आले होते. विद्यार्थ्यांची सहल वेट एँण्ड जॉयला गेल्याची माहिती आहे.

कसा झाला अपघात ?

ही बस खासगी क्लासेसचे विद्यार्थी घेऊन जात होती. त्यामध्ये ४८ विद्यार्थी होते. या अपघातात विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. रायगड जिल्ह्यात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरही बस मुंबईच्या दिशेने येत होती, त्यावेळी बसच्या वाहकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस पलटली. या भीषण अपघातानंतर लागलीच बचावकार्य सुरु झाले.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment