पुणे -प्रियकराच्या त्रासाला कंटाळून प्रेयसीने रेल्वे पटरीवर आत्महत्या केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी हाडपसार पोलिसानी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र तपास अंती मृत व्यक्तीच्या प्रियकरा मुळे आत्महत्या केल्याची प्रकार समोर आल्या ने हाडपसार पोलिसानी त्याला अटक केली आहे. तारामती सुर्यवंशी (वय.३८,रा. सय्यदनगर , मुळ.परळी,जि.बीड) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी, हडपसर पोलिसांनी प्रियकर विक्रांत दशरथ जगताप (वय.३८,रा.फौजी निवास पाटील पार्क बायपास रोड उरळीकांचन) याला अटक केली आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक सुशिल डमरे यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना २०१६ ते १४ जुलै २०२२ या कालावधीत घडली आहे. दरम्यान याबाबत सुरूवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर तपासाअंती जगताप याच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१६ पासून आरोपी विक्रांत जगताप आणि तारामती सुर्यवंशी या दोघांत प्रेमसंबध होते. तारामती या त्यांच्या कुटूंबियांना सोडून जगताप याच्यासोबत राहत होत्या. त्यांना जगताप याच्या शिवाय कोणाचा आधार नव्हता. दरम्यान तो तारामती यांच्यासोबत सतत भांडने करून शिवीगाळ करत मारहाण करत होता. तसेच धमकी देखील देत होता. त्यामुळे सतत होणार्या त्रासाला कंटाळून तारामती यांनी मांजरी परिसरातील रेल्वे पटरीवर जावून आत्महत्या केली. सुरूवातीला याबाबत अकस्मात मृत्यूची हडपसर पोलिसांनी नोंद केली होती. मात्र तपासाअंती जगताप याने दिलेल्या त्रासाला कंटाळून तारामती यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. नातेवाईक हे तक्रार देण्यासाठी समक्ष हजर न झाल्याने पोलिस उपनिरीक्षक डमरे यांनी तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.