महाराष्ट्र

सुंदर पिचाई पद्मभूषण पुरस्कारने सन्मानित

दिल्ली – अमेरिकास्थित भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांनी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे गुगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक समजला जाणारा पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये गुगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांना पद्मभूषण पुरस्काराणे सन्मानित करताना आनंद होत असल्याचे संधू यांनी ट्विट केले आहे. सुंदर पिचाई याचा मदुराई ते माउंटन व्ह्यू हा प्रेरणादायी भारत-अमेरिका प्रवास आर्थिक आणि तंत्रज्ञान संबंध मजबूत करतो आणि भारतीय प्रतिभेची पुष्टी करतो.

अमेरिकेतील भारतीय राजदूतांकडून पद्मभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर, सुंदर पिचाई यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हटले की, भारतीय राजदूत संधू आणि त्यांचे यजमानपद आणि त्यांनी पद्मभूषण दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तर भारत सरकार आणि भारतातील लोकांचा खूप आभारी आहे आणि त्यांच्याबद्दल अपार आदर व्यक्त करतो असे सुंदर पिचाई म्हणाले भारत हा त्यांचा भाग आहे.

हा पुरस्कार स्वीकारतांना , पिचाई म्हणाले की, तांत्रिक बदलांच्या वेगवान गतीचे साक्षीदार होण्यासाठी अनेक वर्षांमध्ये भारतात परतणे खूप छान आहे., भारतात डिजिटल पेमेंटपासून व्हॉईस तंत्रज्ञानापर्यंत केलेले बदल जगभरातील लोकांना लाभत आहेत. तंत्रज्ञानाचे फायदे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही एकत्र काम करत असतांना गुगल आणि भारत यांच्यातील उत्तम भागीदारी सुरू ठेवण्यास ते उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. तर सुंदर पिचाई यांना पदमभूषण पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर जगभरातून त्यांच्यावर शुभेच्यांचा वर्षाव सोशल मीडियावर होत आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment