पश्चिम महाराष्ट्र

सुनील फुलारी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक

कोल्हापूर – कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून सुनील फुलारी यांची शनिवारी नियुक्ती करण्यात आली. विद्यमान विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांची पिंपरी-चिंचवडला सहआयुक्त पदावर बदली झाली.

फुलारी हे नागपूरचे आहेत. त्यांनी यापूर्वी नागपूर, मुंबई, पुणे शहर तसेच नाशिक शहरला पोलिस उपायुक्त, सांगलीचे पोलिस अधीक्षक म्हणून कामगिरी बजावली आहे. संघटित गुन्हेगारीसह काळ्या धंदेवाल्यांविरुद्ध त्यांनी उघडलेली मोहीम धडकी भरविणारी होती. कोल्हापूर परिक्षेत्राचे ते ३२ वे विशेष पोलिस महानिरीक्षक आहेत.

मनोज लोहिया यांनी कोल्हापूर, सांगलीसह पाचही जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारी, आंतरराज्य दारू व अमली पदार्थ तस्करांसह सुमारे ३५ टोळ्यांवर मोका कायद्यांतर्गत कारवाईचा बडगा उगारला. त्यांच्या कार्यकाळात सीमा भागातील गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी महाराष्ट्र-कर्नाटकातील अधिकार्‍यांच्या दोन उच्चस्तरीय बैठकाही झाल्या होत्या.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment