अकोला – महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या संतभूमीमध्ये सुषमा अंधारे या हिंदू धर्मातील देव,देवी संत,महंतांच्या बद्दल पातळी सोडून बोलण्याचे व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रात व्हायरल होत आहेत.यामुळे वारकरी संप्रदायात फार मोठी संतापाची लाट उसळली असून मुळात नास्तिक असणाऱ्या सुषमा अंधारे यांना उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षात स्थान दिलेले आहे. आज हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी या महिलेला कधीही आपल्या पक्षांमध्ये स्थान दिले नसते. म्हणून विश्व वारकरी सेनेच्या वतीने गंगासागर येथे गंगेच्या पात्रात सर्व वारकऱ्यांनी एकत्र येऊन शपथ घेतली ज्या पक्षांमध्ये सुषमा अंधारे राहील आम्ही त्या पक्षाला मतदान करणार नाही. करिता विश्व वारकरी सेनेच्या वतीने उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले व त्या महिलेला आपल्या पक्षातून ताबडतोब बाहेर काढावे अन्यथा महाराष्ट्रातील सर्व वारकरी ज्ञानेश्वरी ग्रंथावर हात ठेवून शपथ घेतील. यापुढे आम्ही ज्या राजकीय पक्षात सुषमा अंधारे आहे त्या पक्षाला मतदान करणार नाही. असा इशारा विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प.श्री.गणेश महाराज शेटे यांनी दिला आहे.