विदर्भ

सोयाबीन चोरल्याचा संशयावरून केली बेदम मारहाण

चंद्रपूर – सोयाबीन चोरल्याच्या संशयावरून दोघाजणांना बेदम मारहाण करण्यात आली. हातपाय बांधून लाथा बुक्क्यांनी मारलं. एवढ्यावरच न थांबता प्लास्टिक पाईपाने जनावराला माराव तस मारलं. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला. व्हिडिओ बघून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

वरोरा येथील विनोद श्रावण देठे यांची आष्टी येथे सतरा एकर शेती आहे. शेतात शेड बांधण्यात आलेला आहे. इथे शेतीचे अवजारे, सोयाबीन ठेवली होती. देठे शेतात गेले असता त्यांना सोयाबीन कमी प्रमाणात दिसले. ठेवलेल्या सोयाबीनमधील अंदाजे दहा क्विंटल सोयाबीन चोरीला गेल्याचे देठे यांचा लक्षात आले. योगायोगाने त्याचवेळी संदीप रागीट व मोहन ठेंगणे हे दोघे दुचाकीने जाताना दिसले. त्या दोघांनी शेतातील सोयाबीन चोरी केल्याचा संशय आल्यावर शेतात त्या दोघांना हात-पाय बांधत मारहाण केली. त्यानंतर देठे यांनी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला. दरम्यान मारहाणीचा व्हिडिओ समाजमाध्यमात वायरल झाला. व्हिडिओमध्ये अमानुषपणे मारहाण केल्याचं दिसत आहे. व्हिडिओच्या आधारावर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment