पश्चिम महाराष्ट्र

स्वामी समर्थ भक्तांना ऑनलाइन गंडा

सोलापूर – स्वामी समर्थ भक्तांना ऑनलाइन फटका बसला आहे. फेक वेबसाईटच्या माध्यमातून सायबर ठगांनी मुंबई, पुणे, नवी मुंबई येथील भक्तांना ऑनलाइन गंडविले आहे. याबाबत सोलापूर येथील सायबर पोलीस ठाण्यात अजून तरी तक्रार दाखल झाली नाही. भक्तनिवास बुकिंगच्या नावाखाली ही फसवणूक झाली आहे.

भक्तनिवासच्या नावाखाली फसवणूक
सोलापूरमधील अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना भक्तनिवासाच्या बुकिंगच्या नावे गंडा घातला जात असल्याचं समोर आलं आहे. मागील एका महिन्यात अशा अनेक घटना घडल्या असून मुंबई, नवी मुंबई, पुण्यातील भक्तांची फसवणूक झाली.

इंटरनेटवर भक्तांना शोधून सायबर ठग फसवणूक करत आहेत
इंटरनेटवर भक्तनिवासाची माहिती शोधून ऑनलाईन बुकिंग करणारे भक्त या सायबर ठगांकडून गंडविले जात आहेत. अशाच प्रकारे रोज २० ते २५ जणांच्या फसवणुकीच्या तक्रारी येत असल्याचंही व्यवस्थापनाने स्पष्ट केलं आहे.

भक्त निवासाची वेबसाईट उपलब्ध नाही
वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान यांच्यामार्फत भक्तनिवास चालवलं जातं. मात्र, त्याचे कोणतेही अधिकृत संकेतस्थळ नाही. तरीदेखील सायबर गुन्हेगार बनावट संकेतस्थळ तयार करून फसवणूक करत आहेत. त्यामुळे स्वामी समर्थ भक्त अक्कलकोटला जाणार असतील सावध असावे. कारण भक्त निवासाची कोणतीही अधिकृत वेबसाईट नाही.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment