स्वराज्य भूषण 2022 पुरस्काराने एड. प्रदीपभाई पाटील, एड. आकाश काकडे आणि संयुक्ता देशमुख जी सन्मानित
मराठा सेवा संघाचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन पार
दिल्ली
संमेलनाचे वैशिष्टय़ असे की, विचारसरणीच्या अगदी विरुद्ध असणारे दोन टोकं एका विचारपीठावर आणण्याचे काम मराठा सेवा संघाच्या दुसऱ्या प्रयोगातून यशस्वी झाले.
माजी मंत्री, संघाचे कार्यकर्ते आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे जी आणि शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत जी या अधिवेशनाला उपस्थित होते.

अध्यक्षस्थानी अनुक्रमे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार होते.
उत्तर भारतातील या प्रसिद्ध संमेलनात महत्त्वाची भूमिका बजावणारे मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रदीपभाई पाटील, दिल्ली प्रदेशाध्यक्ष आकाश काकडे, 25 कोटी लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशच्या जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश कार्याध्यक्षा शिवमती संयुक्ता देशमुख यांना स्वराज भूषण 2022 पुरस्काराने राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार आणि जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ.निर्मलाताई पाटील यांचाहस्ते प्रशस्त शिवराज्याभिषेक प्रतिमा आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

मराठा सेवा संघाचे उत्तर भारतीय पार्श्वभूमीचे नेते व राष्ट्रीय कार्याध्यक्ष कमलेश पाटील जी यांनी अधिवेशनाच्या यशस्वीतेबद्दल विविध राज्यातील सहकाऱ्यांचे व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
संघटनेच्या राजधानी दिल्लीतील पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रात छत्रपती शिवराय महाराजांचे वंशज खासदार संभाजी राजे, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री विनोद तावडे यांची उपस्थिती होती.

दोन दिवसीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार होते, तर समरोपीय अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर होते.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भारतीय प्रशासकीय सेवा आणि भारतीय पोलिस सेवेतील डझनभर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी 24 राज्यांचे अध्यक्ष, पदाधिकारी, संघटनेच्या विविध चेंबर्सचे 30 राष्ट्रीय कार्यप्रमुखांसह सुमारे 200 अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय स्तरावर काम करणा-या जवळपास विविध जाती समाजातील 18 शेतकरी पशुपालक समाजाजचे राष्ट्रीय अधिकारी उपस्थित होते. ज्यामध्ये प्रख्यात शेतकरी आंदोलक राकेश टिकैत जी, प्रकाश पोहरे जी, अविनाश काकडे जी, यशपाल मलिक जी, रेखाताई खेडेकर, जितेंद्र यादव, प्रमोद पटेल, गुर्जर मनीष चौधरी, संतोष उमराव जी उपस्थित होते.
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रदीप पाटील होते तर समारोपीय आभार मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष कमलेश पाटील यांनी मानले.