मुंबई

तलवारीने केक कापणे पडले महागात आरोपी गजाआड

दिवा – तलवारीने केक कापणारे आणि तलवारी जवळ बाळगणाऱ्या चार आरोपींना शिळ डायघर पोलीसांनी अटक केली आहे.या आरोपीमध्ये कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील १४ गावातील राष्ट्रवादीचा पदाधिकारी जीवन वालीलकर ( वय 35) याचा सुद्धा समावेश आहे.

काही दिवसांपासून सोशल मीडियावर आरोपी जीवन वालीलकर याच्यासह इतर तीन आरोपीचे तलवारी सोबत असलेले फोटो व्हायरल होत होते आणि याची चर्चा ग्रामीण भागात होत होती. अखेर पोलिसांनी तलवारी जवळ बाळगणाऱ्या ०४ इसमांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण ०४ तलवारी हस्तगत केल्या आणि त्याच्या विरोधात गु.रजि.क्र. ३४६ / २०२२, गु.रजि. क्र. ३४७/२०२२ व गु.रजि.क्र. ३४८/२०२२, भा.ह. का. कलम ४, २५ सह महा. पोलीस कायदा कलम ३७ (१), १३५ प्रमाणे एकूण ०३ गुन्हे दाखल करत अटक केली. विशेष म्हणजे या आरोपींमध्ये कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील १४ गावातील राष्ट्रवादीचा पदाधिकारी जीवन वालीलकर ( वय 35) याचा सुद्धा समावेश आहे.

तर मोहंमद गुलजार पिरमोहंमद खान उर्फ राहुल उर्फ काल्या (वय २३),मोहंमद सोहेल रईस खान (वय ४०), मोहंमद राशिद अब्दुल हय शाह (वय ३८) अशी तीन आरोपीची नावे आहेत. सर्व आरोपींची सध्या न्यायालयीन कारागृहात रवानगी करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment