अमरावती – येथील विकास का समारंभात आज राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार यांनी अजित पवार यांच्यावर स्तुती सुमने उधळत जर पहिल्या शपथविधीचा वेळ सकाळ ऐवजी दुपार असतात तर आज दादा आपण मुख्यमंत्री राहिले असते अशी टिप्पणी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित अहिल्यादेवी पुरस्कार वितरण सोहळ्यात अजितदादा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर राष्ट्रवादीच्या नेत्या सुरेखाताई ठाकरे सलील देशमुख यांच्यासह अनेक मोठी मंडळी उपस्थित होती यावेळी भाजप आमदार प्रवीण पोटे यांनी अजित पवार यांचे कौतुक केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.