मुंबई

अल्पवयीन मुलीवरती अतिप्रसंग करून गर्भवती ठेवणाऱ्या तरुणाला अटक

कल्याण – कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यामध्ये आज एक गंभीर गुन्हा दाखल झाला असून यामध्ये ठाणे पश्चिम मध्ये अशोक नगर मध्ये राहणाऱ्या २२ वर्षीय अक्षय बाळू गायकवाड यांनी कोळसेवाडी हद्दीतील एका पंधरा वर्षे नऊ महिन्याच्या अल्पवयीन मुली सोबत इंस्टाग्राम वरती मैत्री बनवून तिला त्याने आपल्या जाळ्यात ओढले आणि डिसेंबर २०२१ पासून आरोपी अक्षय गायकवाडने तिच्यावर अनेक वेळा शारीरिक अत्याचार केले. त्यात ती सहा महिन्याची गरोदर असल्याची माहिती समोर आल्याने तिच्या बहिणीने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्वरित गुन्हा दाखल करत अक्षय गायकवाड नराधमाला ताब्यात घेतले असून अटक केली. त्यामुळे सोशल मीडिया मार्फत मैत्री बनवताना अल्पवयीन मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी सावधगिरी बाळगणे काळाची गरज आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास कोळसेवाडी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी महिला पोलीस उपनिरीक्षक एन के भोईगड करत आहेत असे क्राईम पी आय सुनील गवळी यांनी सांगितले..

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment