अमरावती – अमरावती जिल्हात महिलांवर होणाऱ्या अत्याचार मध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच एका शिक्षकाने विद्यार्थिनीला स्टोअर रूममध्ये टाचणी आणण्यासाठी पाठवले आणि एकांतत तिचा फायदा घेत त्या मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या शिक्षकाला न्यायालयासमोर हजर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तेरा वर्षीय विद्यार्थिनीसोबत असभ्य वर्तन केल्याच्या आरोपामुळे एका शिक्षकाविरुध्द सोमवारी रात्री विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात संबंधित शिक्षकाला जिल्हा परिषद सीईओंच्या आदेशाने निलंबित करण्यात आले.
प्रशांत चक्रधर सोनार (४२) असे निलंबित झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. धारणी तालुक्यातील एका शाळेत शिक्षक असलेल्या सोनार यांनी सोमवारी सकाळी एका १३ वर्षीय विद्यार्थिनीला टाचणी आणण्यासाठी पाठवले. शिक्षकांनी सांगितल्यामुळे विद्यार्थिनी टाचणी आणायला गेली असता शिक्षक सोनारविद्यार्थिनीच्या मागे गेला व त्याने आपल्यासोबत असभ्य वर्तन केले, अशी तक्रार पीडित विद्यार्थिनीने धारणी पोलिसांत दिली. या वरून पोलिसांनी शिक्षकाविरुध्द तत्काळ विनयभंग तसेच पोस्को कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली.
दरम्यान, मंगळवारी धारणी पोलिसांनी सोनारला न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तर या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अविशांत पंडा यांच्या आदेशान्वये धारणी पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांनी मंगळवारी सोनार यांच्या निलंबनाचे आदेश काढले.