कोंकण मराठवाडा

रेवदंडा हद्दीत मुरुड साळाव मार्गावर मोटारसायकलचा भीषण अपघात

रायगड – जिल्हयात रेवदंडा हद्दीत मुरुड साळाव मार्गावर मोटारसायकलचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. दुचाकीच्या मागच्या सिटवर बसलेला जखमी झाला आहे. हा अपघात साळाव नाका येथे झाला. हा अपघात इतका मोठा होता की डबलसीट बसलेले जयेंद्र माळी हे कठडयाच्या बाजूला असलेल्या एका घराच्या छतावर जाऊन आदळले. या अपघातामध्ये चालक मदनकुमार कन्हाई याचा मृत्यू झाला आहे. डबलसीट बसलेले माळी जखमी झाले आहेत.

मदनकुमार कन्हाई रजक (रा. पिंपरा, बगाही, औरगांबाद, बिहार सध्या रा. साळाव बिर्ला मंदिर नजीक चाळ) हा रविवार दि. १५ जानेवारीला सायंकाळी मुरूड- साळाव मार्गे रोहा रस्त्याने चेहेर गावाकडे दुचाकीने जात होता. त्याच्यासोबत यावेळी जयेंद्र मधूकर माळी (रा. चेहेर, ता. मुरूड) हे मागच्या सीटवर बसले होते. सावळा नाका येथे वळणावर मदनकुमार याचा मोटर सायकलवरील ताबा सुटला आणि त्याची दुचाकी साईटच्या कठडयाला जावून धडकली. असून जयेंद्र माळी हे जखमी झाले.

याबाबत रेवदंडा पोलिस ठाणे येथे मोटर वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे भा.द.वि.सं.क ३०४ (अ) २७९, ३३७, ३३८ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या अपघाताची फिर्याद रविंद्र मधूकर माळी रा. चेहेर यांनी दिली आहे. अधिक तपास रेवदंडा पोलिस ठाणे पो.नि. मुपडे यांचे मार्गदर्शनानुसार पोलिस हवालदार भोईर हे करत आहेत.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment