मुंबई

मलंगगड विभागातील ठाकरे गटाचे शिवसैनिक शिंदे गटात सामिल

कल्याण – राज्यातील ठाकरे – शिंदे या शिवसेनेच्या दोन गटापैकी खरी शिवसेना कोणाची या वादाची सुनावणी केंद्रीय निवडणुक आयोगाकडे चालु असतांनाच ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश करण्याच्या घटना संपुर्ण राज्यातून कुठे ना कुठे समोर येत आहेत यातच मलंगगड विभागातील ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे .

बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभर विविध विकास कामांचा धडाका लावला आहे. त्यांचेच सुपूत्र असलेले खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदार संघातील मलंगगड विभागातील ठाकरे गटातील वसारचे शाखा प्रमुख अशोक म्हात्रे, उपविभाग प्रमुख संजय फुलोरे, उप विभाग अधिकारी सुभाष गायकर,  बजरंगदलाचे प्रमुख राजेश गायकर यांचे सह सर्वश्री हरीष पावशे, रवी शेलार,  शिवाजी भोईर, दिपक वायले, जोगेंद्र म्हात्रे, अक्षय म्हात्रे, अतुल म्हात्रे, जय वायले, काळु मढवी आणि ताराचंद सोनावणे यांनी शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी जावून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वा खालील बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.

या समयी महेश गायकवाड यांनी सांगितले की, राज्याला लोकांमध्ये जावून लोकांचे प्रश्न सोडविणारे एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पहिलेच मुख्यमंत्री मिळाले आहेत, त्या मुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे युवा पिढीचा विश्वास संपादन करण्यात बाळासाहेबांची शिवसेना यशस्वी होत आहे, खासदार डॉ . श्रीकांत शिंदे यांच्या विकास कामांनाही जनता प्रभावीत होऊन बाळासाहेबांच्या शिवसेनेला मोठा जनाधार मिळत आहे, भविष्यातही कल्याण मधील अनेक शिवसैनिक – पदाधिकारी बाळासाहेबांच्या शिवसेनेत येतील याची मला खात्री आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment